श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये खाद्य महोत्सवाचे आयोजन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारण मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.
या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले व संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धा राजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत,नियामक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, सदस्य डॉ. सतीश सावंत,
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर,आय क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. बी एन हिरामणी, कला व सांस्कृतिक महोत्सव समिती सदस्य डॉ. डी.जी बोर्डे ,डॉ. एस एम बुवा,डॉ. एस ए देशमुख,डॉ.व्ही.पी. सोनाळकर, प्रा.सौ एन डी धुरी,सौ पी डी सावंत,प्रा. ए.ए कांबळे तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या खाद्य महोत्सवामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण 34 स्टॉल लावलेले होते या स्टॉलमध्ये मोमोज, माचो,मोदक, मोजीतो, चिकन टिक्का, सँडविच, पाणीपुरी, शिरवाळ्या रस, शिरकुर्मा, प्रॉन्स बिर्याणी चिकन बिर्याणी, फ्रुट सलाड, झुणका भाकर, आईस्क्रीम, असे अनेक स्टॉल्स लावलेले होते. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी त्याचा आस्वाद घेतला.