You are currently viewing शासनमान्य ग्रंथालयांनी असमान निधीसाठी 8 जानेवारी 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

शासनमान्य ग्रंथालयांनी असमान निधीसाठी 8 जानेवारी 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता असमान निधी योजनेतंर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सार्वागिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी दिली.

            सन 2020-21 असमान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांनी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि. 8 जानेवारी 2021 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत.  ऑनलाईन प्रस्ताव सादर केल्यानंतर चार प्रतीत प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे देण्यात यावे. तरी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय कार्यालयमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =