You are currently viewing शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध…

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध…

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध…

भाजप राणेंवर कारवाई करणार का?…. इर्शाद शेख

सावंतवाडी

शंकराचार्यां यांच योगदान काय ? अस वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध करत असल्याच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.दरम्यान शंकराचार्यांबाबत अस वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंवर भाजप केव्हा कारवाई करणार ? असा सवाल देखील श्री इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी कॉंग्रेस नेते विकास सावंत, समिर वंजारी, अँड. राघवेंद्र नार्वेकर विभावरी सुकी इ. उपस्थित होते.

मंदीर पुर्ण होण्याआधी प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे शंकराचार्य यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवर तोंड सुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्याचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचा वक्तव्याचा निषेध करत आहे. शंकराचार्याचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणे यांचे तरी राम मंदिरसाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतूनळ काँग्रेस व नंतर भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मोदीसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेच उल्लंघन केले नाही. ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन 14 वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यावर तोंडसुख घेणारे नारायण राणे यांसारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदू धर्माला कलंक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा