You are currently viewing मांगूरात प्रा. यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन

मांगूरात प्रा. यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन

मांगूर : प्रतिनिधी

 

निपाणी तालुक्यातील मांगूर येथील समर्थ फाउंडेशन यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. श्री भैरवनाथ मंदिराच्या पटांगणामध्ये प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांचे शिवचरित्र आणि आजचा युवक या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती समर्थ फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष विशाल सुतार यांनी दिली.

या कार्यक्रमास मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,जानकी वृद्धाश्रम घोसरवाडचे संस्थापक बाबासो पुजारी, निपाणीचे सामाजिक कार्यकर्ते ए.एच. मोतीवाला, कागलचे माजी नगरसेवक धैर्यशील इंगळे, इतिहास मोडी लिपी अभ्यासक प्रा. डॉ. कपिल राजहंस, सदलगा पोलीस ठाण्याची फौजदार शिवकुमार बिरादार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी समर्थ फाउंडेशनचे संस्थापक रोहन जाधव,अध्यक्ष राजेंद्र राजहंस,उपाध्यक्ष अमित जाधव, कार्यकारी उपाध्यक्ष सचिन आवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =