You are currently viewing साटेलीतील धोकादायक वळणावर दोन दुचाकींमध्ये धडक

साटेलीतील धोकादायक वळणावर दोन दुचाकींमध्ये धडक

साटेलीतील धोकादायक वळणावर दोन दुचाकींमध्ये धडक; चारजण जखमी, दुचाकीचे मोठे नुकसान

सावंतवाडी

पेंडूर येथील युवक आपल्या दुचाकीने गोव्याच्या दिशेने जात असताना साटेली येथील धोकादायक वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मळेवाडहून साटेलीच्या दिशेने दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात चार जण जखमी झाले असून यात एका लहान मुलाचा समावेश आहे. तर जखमीमधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींना उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ॲम्बुलन्सची वाट न पाहता मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपल्या खाजगी गाडीमध्ये सदर अपघातग्रस्तांना घेऊन मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातअधिक उपचारासाठी दाखल केले. अपघातात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − eight =