You are currently viewing मळगांव हायस्कूलच्या श्रीमती गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंचाचे लोकार्पण

मळगांव हायस्कूलच्या श्रीमती गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंचाचे लोकार्पण

मळगांव हायस्कूलच्या श्रीमती गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंचाचे लोकार्पण

सावंतवाडी

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या प्रांगणावर प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा बांदा पानवळ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शरद शिरोडकर व त्यांचे बंधू यांनी स्वनिधीतून आपली आई श्रीमती गोपिका बाबणी शिरोडकर यांच्या स्मरणार्थ देणगी स्वरूपात उभारलेल्या रंगमंचाचे लोकार्पण उत्साहात संपन्नी झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर या रंगमंचावर मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणदर्शन सोहळा पार पडला.

मळगांव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,विद्यार्थी-विद्यार्थीनी,निमंत्रीत मित्र परिवार व प्रा.डॉ.शरद बाबणी शिरोडकर यांचे कुटूंबिय, नातेवाईक तसेच क्रीडा समिती सल्लागार मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगांवचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. शरद शिरोडकर व भाऊ सुभाष शिरोडकर सौ. सविता शिरोडकर यांच्या तीन लाख देणगीतून प्रशालेसाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या श्रीमती गोपिका बाबणी शिरोडकर नवीन रंगमंचाचं उद्घाटन व लोकार्पण थाटामाटात संपन्न‌ झाले.

सदर कार्यक्रमाला मळगाव ऐक्यवर्धक संघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ स्थानिक कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ संस्था संस्थापक सदस्य सिताराम नाईक संचालक सदस्य रामचंद्र केळुसकर, बाप्पा नाटेकर, मुख्याध्यापक फाले सर ,गुरुनाथ गावकर या समई मंचावर सिंधुदुर्ग जिल्हा हौशी संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिल हळदीवे केंद्रीय सैनिक दलातील माजी सैनिक विकास केरकर दत्तप्रसाद क्रिकेट मंडळाचे जेष्ठ खेळाडू व माजी सैनिक अंतोन फर्नांडिस, प्रकाश नार्वेकर संजय धुरी ,संदीप देवळी यांच्यासह

मळगांव एक्यवर्धक संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे शिक्षक, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तिवरेकर सर यांनी केले. यावेळी दत्तप्रसाद मंडळाच्यावतीने माजी खेळाडू शरद शिरोडकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =