You are currently viewing सिंधुदुर्गात यावर्षी भात खरेदीचा उच्चांक

सिंधुदुर्गात यावर्षी भात खरेदीचा उच्चांक

३ हजार ९९५ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ४८१ क्विंटल भाताची खरेदी

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या सर्व भात खरेदी केंद्रांमधून २० फेब्रुवारी पर्यंत एकूण ४४ हजार ४८१ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. आ. वैभव नाईक यांनी भात खरेदी बाबत शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृती मुळे एकूण ३ हजार ९९५ शेतकऱ्यांनी भात विक्री केली.त्यांना १८६८ रु हमीभाव देण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना क्विंटलमागे बोनस स्वरूपात ७०० रु. देण्याचे जाहीर केले असून एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. गतवर्षी ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती यावर्षी त्यात आतापर्यंत ७ हजार ५९९ क्विंटलची वाढीव भात खरेदी झाली असून अजूनही भात खरेदी सुरू आहे. आतापर्यंतची सिंधुदुर्ग मधील हि उच्चांकी भात खरेदी आहे. यामुळे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयात भात पीक हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शेतकऱ्यांना भात पिकातून अधीकाधीक उत्पादन घेण्यासाठी आ.दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून, कृषी यांत्रिकिकरण अंतर्गत शेतकऱयांना शेती आवजारे सबसिडीतुन देण्यात आली.त्याद्वारे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनाला शासनाकडून जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याचबरोबर यावर्षी लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व शासनस्तरावर आ. वैभव नाईक यांनी पाठपुरावा केल्याने २०२०-२१ मध्ये ऑक्टोबर पासून भात खरेदीला सुरुवात करण्यात आली.
भात खरेदीसाठी २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव देण्यात येत आहे. तसेच बोनस स्वरूपात ७०० रु. देण्यात येणार असून एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे यावर्षी सर्वाधिक कुडाळ शहरातील भात खरेदी केंद्रावर ६ हजार ८८१ क्विंटल भात खरेदी झाली तर निवजे सारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर १ हजार ९५ क्विंटल भात खरेदी झाली. जिल्हयात एकूण ७ कोटी ६८ लाख ४७ हजार रु च्या भाताची खरेदीची नोंद झाली आहे त्यातील ४ कोटी ७८ लाख ६३ हजार रु शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे.
आ.दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे झालेल्या बजाज राईस मिलमार्फतही शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात आली. गतवर्षी बजाज राईस मिलने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून भात खरेदी केले होते.त्यासाठी वेळ लागत होता. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फ़त भात खरेदी करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.त्याला देखील मान्यता देण्यात आल्याने बजाज राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करून थेट शेतकऱ्यांकडून भाताची चांगली उचल करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 1 =