You are currently viewing बांदा ग्रामस्थांचे 26 जानेवारीला “भीक मांगो” आंदोलन

बांदा ग्रामस्थांचे 26 जानेवारीला “भीक मांगो” आंदोलन

*बांदा ग्रामस्थांचे 26 जानेवारीला “भीक मांगो” आंदोलन*

BSNL कडुन तत्पुर्वी टॉवर सुसज्ज करण्याची लेखी हमी

सावंतवाडी

भारत संचार निगमच्या मनमानी सेवेने त्रस्त बांद्यातील नागरीक व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत सावंतवाडीतील भारत संचार निगमच्या कार्यालयात जोरदार धडक दिली.
यावेळी बांदा व परिसरातील ५० नागरिक उपस्थित होते.त्यांच्याकडून भारत संचार निगमचे सिंधुदुर्ग उप- महाप्रबंधक, श्री.आर.व्ही जानू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी बांदा मराठा समाज सचिव आनंद वसकर यांच्याकडून अधिकाऱ्यांना ढीसाळ सेवेबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर अधिकाऱ्यांना कोणतेही समर्पक उत्तर देता आले नाही. श्री.गुरुदास गवंडे यांच्याकडून ग्रामीण भागातील मोबाईल धारकांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. तसेच फ्रीक्वेन्सीबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तसेच अक्षय परब यांच्याकडुन सोलर सिस्टिम बसवण्याकरिता त्वरीत प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ता गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांनी वीज बंद झाल्यावर बॅटरी बॅकअप नसल्याने रेंज नसते. इंटरनेट बंद झाल्याने बॅकींग , OTP,UPI, तसेच इतर आर्थिक व्यवहारावर परीणाम होतो व लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे २६ जानेवारी पूर्वी बांदा टॉवर बॅटरीने सुसज्ज न झाल्यास २६ जानेवारी रोजी भारत संचार निगमकडे पैसे नसल्याने त्यांच्याकरिता अधिकाऱ्याना सोबत घेऊन भारत संचार निगमच्या कार्यालयासमोर “भीक मांगो”आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावर उप- महाप्रबंधक श्री.जानु यांच्याकडून उपस्थित नागरिकांना २५ जानेवारी पर्यंत बांदा टॉवर बॅटरीने सुसज्ज करू असे लेखी आश्वासन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,हेमंत दाभोळकर, गुरुदास गवंडे,आनंद वसकर,सागर मोर्ये,अक्षय परब, चिन्मय नाडकर्णी, मिलिंद सावंत, प्रथमेश गडकरी, विष्णु वसकर, प्रथमेश परब, रोहित रेडकर, महेश वसकर, प्रदीप कळंगुटकर, कौस्तुभ दळवी, सदाशिव मोर्ये आदी नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा