You are currently viewing शून्यातून शून्याकडे

शून्यातून शून्याकडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*शून्यातून शून्याकडे*

 

एखाद्या प्रसंगानंतर काही माणसं मनातनं उतरत जातात. जितकं प्रेम, ओलावा, आदर आधी वाटत असतो तो काही केल्या परत वाटेनासा होतो. एखादी घटना किंवा प्रसंग आपल्याला किती काही शिकवून जातो ना?

माणसाचं खरं रूप कुठलं, मुखवटा कुठला हे कळणं निश्चितच खूप खूप त्रासदायक असतं. माणूस आणि सरडा यात काहीच फरक नाही का? शेवटी शेवटी तर असाही विचार येतो की या गोष्टी घडल्याच नसत्या तर किती बरं झालं असतं, निदान आपल्याला कळल्या नसत्या तरी चाललं असतं. कारण एकच असतं, जी माणसं मनातून उतरत चाललेली असतात ती आपल्याला तश्शीच्या तशीच हवी असतात, अगदी पहिल्यासारखी. आपला स्वार्थच असतो तो असं म्हणूया पाहिजे तर. पण पुन्हा सगळं नीट व्यवस्थित व्हावं किंवा होईल अशी एक भाबडी आशा कुठेतरी मनात तग धरून असते. पण काळ पुढे सरकलेला असतो. काळाच्या पाऊलखुणा स्वतः काळालाही कुठे पुसता येतात?

पुढे पुढे आपणच विचार करतो की आपलंच कुठंतरी चुकत असलं पाहिजे की एवढी अपेक्षाच करायला नको होती आपण. अपेक्षाभंगाचं दुःखं माणसाला आतून पोखरत जातं. आणि कोण कुठल्या परिस्थितीत कसा वागेल याचे काही नियम थोडेच असू शकतात? कशाला आडाखे बांधावे? त्याच्या वागण्याबद्दल त्याचंही समर्थ उत्तर असेलच की.

मग प्रश्न कुठे उरला आता? का त्रास होतोय?

मला वाटतं त्रास होतो बदलाचा. माणसं बदलतात,त्यांचं वागणं बदलतं… आणि हा बदल आपल्या पचनी पडत नाही. आपण अजूनही लहान मुलासारखं त्याच गोष्टींचा हट्ट धरून बसतो, म्हणून त्रास होतो.

प्रत्येक क्षण नवा आहे. तो नव्यानं अनुभवायला हवा.एकदा तो हातातून निसटला की पुन्हा जसाच्या तसा परत मिळूच शकत नाही. हे क्षणाचं क्षणभंगूर असणंच किती सुंदर आहे. अशाश्वतता आहे म्हणून इच्छा आहे,आकांक्षा आहे आणि म्हणूनच जीवन इतकं प्रवाही आहे. शून्यातून पुन्हा शून्याकडे प्रवास सुरू असतो पण म्हणून झाकोळून जातं का कोणी? नाहीच. तसंच आशा, निराशा, अपेक्षा यासुद्धा आपल्या जीवनाचा भाग आहेत. बस जरूरी आहे ते त्यांचा समतोल साधता येणं. या भावनांच्या हिंदोळ्यात स्वतःला हरवून न बसता स्वःताला शोधता येणं महत्त्वाचं. दुःख झालं म्हणून आयुष्यभर कुणी दुःखी राहू शकत नाही. मग तो वेडाच होईल. तसंच सुखानंही हुरळून गेलं तरी ते फार काळ टिकत नाही. सुखाचा माज उतरविण्यासाठी काळ टपून बसलेला असतो. उतू नये मातू नये म्हणतात ते उगाच नाही.

निराशेच्या खोल गर्तेत जाणं अगदी स्वाभाविक आहे पण त्यातून काही काळाने तावून सुलाखून उजळून बाहेर पडलो तर तो आपल्यातल्या माणसाचा विजय ठरतो. परिस्थितीने म्हणा, इतर लोकांच्या किंवा आपल्याही चुकीने म्हणा असे चढ उतार आयुष्यात येणारच. पण काही गोष्टी मागे टाकून तर काही गोष्टी बरोबर घेऊन पुढे चालावं लागतं. आत्मविश्वासाने टाकलेलं पुढचं प्रत्येक पाऊल नवी दिशा,नवा बदल घेऊन येतो.जन्माला आलो ते रिकाम्या हाताने आणि परतही रिकाम्या हातानेच जायचं आहे, जमवलेल्या वस्तू असूदेत अथवा गोतावळा…तो सरणापर्यंतच साथ देईल पुढे आपला मार्ग एकटा. हे सत्य स्वीकारलं की बदल स्वीकारता येतील.

निसर्ग आपल्याला हेच शिकवत आहे, जगातली प्रत्येक गोष्ट बदलतीय, कदाचित आपणही त्याबरोबर स्वतःला डोळसपणे, समंजसपणे बदलणं हीच काळाची गरज आहे.

हो ना?

 

©®अंजली दीक्षित-पंडित

 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + five =