You are currently viewing कारीवडेत कंटेनरची दुचाकीला धडक, मणेरीतील महिला जखमी

कारीवडेत कंटेनरची दुचाकीला धडक, मणेरीतील महिला जखमी

कारीवडेत कंटेनरची दुचाकीला धडक, मणेरीतील महिला जखमी

सावंतवाडी

कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यामुळे कारिवडे येथे झालेल्या अपघातात मणेरी येथील महिला जखमी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-आंबोली राज्यमार्गावर घडला घडला. प्राची कदम असे संबंधित महिलेचे नाव आहे. सुदैवाने तिच्या समवेत दुचाकीने प्रवास करणार्‍या पतीसह दोन लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कंटेनर चालकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जखमी कदम यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा