You are currently viewing मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिरापर्यंत बंधारा कम रस्ता व्हावा – सौरभ ताम्हणकर

मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिरापर्यंत बंधारा कम रस्ता व्हावा – सौरभ ताम्हणकर

मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिरापर्यंत बंधारा कम रस्ता व्हावा – सौरभ ताम्हणकर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी

मालवण

मालवण बंदर जेटी ते दांडी येथील दांडेश्वर मंदिर पर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्ता व्हावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गचे सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.

मालवण शहरात पर्यटन वाढी करीता विकासकामे होणे गरचेचे आहे. दि. ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्यानंतर मालवण शहरात पर्यटकांची आणखी वाढली आहे. त्याचप्रमाणे मालवण बंदर जेट्टी ते मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरा पर्यंत कोस्टल रोड म्हणजेच बंधारा कम रस्ता होणे गरजेचे आहे. ह्या मार्गामुळे मालवण बंदर जेट्टीवर आलेला पर्यटक कोस्टल रोडच्या साह्यानें समुद्राच्या लाटांचे दर्शन घेत दांडेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकतो. त्याच प्रमाणे किनारपट्टी भागाला काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ह्या मार्गामुळे किनारपट्टी भाग देखील स्वच्छ राहू शकतो. तसेच कोस्टल रोडमुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर मोठ्या गाडीत मच्छी भरणे देखील सोपे होणार आहे. मालवण शहरातील दांडी परिसरात अतिवृष्टी वेळी किंवा समुद्राच्या उधाणाच्या वेळेस समुद्राचे पाणी किनाऱ्याववरील वस्तीत घुसते, त्याचे प्रमाणही कोस्टल रोडमुळे कमी होईल. हा रस्ता आल्यास मालवण शहरात पर्यटनास आणखी चालना मिळणार आहे. तरी हा धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्ता लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी या निवेदनात केली आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग उपाध्यक्ष राकेश सावंत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा