You are currently viewing नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष होते उपस्थित

परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे सादर, त्याला त्वरित मंजुरी द्यावी

कणकवली

कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मा.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार मा.नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नवीन कुर्ली वसाहतीमधील ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधिमंडळ कामकाजा वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.)चे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सूरज तावडे, सचिव धीरज हुंबे, कृष्णा परब,अमित दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रामपंचायत चा परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात सादर केलेला आहे त्याला त्वरीत मंजुरी द्यावी अशी मागणी केली.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी गिरीष महाजन यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा