*”दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस*
पिंपरी
“दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू असतो!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान सभागृह, शिवतेजनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. कवयित्री कांचन नेवे लिखित ‘स्वानंदाच्या झुल्यात’ आणि ‘गंध प्राजक्त’ या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा, ललिता सबनीस, रजनी अहेरराव, श्रीकृष्ण नेवे आणि कवयित्री कांचन नेवे यांची व्यासपीठावर तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “कल्पनाविलासाचा सौंदर्य आविष्कार हे कवितेचे खरे सामर्थ्य असते. सुंदर प्रतिमांनी नटलेल्या कांचन नेवे यांच्या कवितांमध्ये पौराणिक संदर्भांसह आधुनिकताही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कविता आपल्याला साथ देईल, ही कवयित्रीची कवितेवरील निष्ठा प्रशंसनीय आहे. निसर्ग आणि जीवन यामधील समतोल साधताना त्यांनी निसर्गाच्या रौद्र रूपाचा धांडोळा घ्यावा!” राजन लाखे यांनी, “आनंदी जीवन आणि निसर्गचित्रण असे दोन आयाम कवयित्रीने आपल्या दोन्ही संग्रहांमधून समर्थपणे मांडले आहेत!” असे मत व्यक्त केले. राज अहेरराव यांनी, “संपूर्ण कुटुंब साहित्यात किती रममाण झाले आहे, याचा एकमेव वस्तुपाठ म्हणजे कांचन नेवे यांचे कुटुंब होय. कवयित्रीने बोलीभाषेतील शब्दांचा केलेला वापर रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील!” असे गौरवोद्गार काढले.
कांचन नेवे यांनी आपल्या मनोगतातून, “एकत्रित कुटुंब आणि कविता यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याचे बळ प्राप्त झाले. आईच्या ओव्यांमधून काव्याची गोडी लागली. कुटुंबीय आणि विशेषतः बंधू रमेश रघुनाथ नेवे – वाणी यांचा पाठिंबा अन् प्रोत्साहनामुळे कवितालेखन घडत गेले!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. रजनी अहेरराव, ललिता सबनीस, माधुरी डिसोजा यांनी कांचन नेवे यांच्या कवितांचे अभिवाचन केले. बाबू डिसोजा यांनी नेवे परिवाराशी असलेल्या स्नेहबंधाला उजाळा दिला; तर अजय नेवे यांनी हृद्य शब्दांत आईच्या वात्सल्याच्या आठवणी जागवल्या.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि योगिता कोठेकर यांनी गायलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष नारायण बहिरवाडे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके आणि नेवे परिवार यांनी संयोजन केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. विजय नेवे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*