You are currently viewing मनसे भविष्यात सक्षम पर्याय म्हणून उभा राहील – निरीक्षक संदीप दळवी

मनसे भविष्यात सक्षम पर्याय म्हणून उभा राहील – निरीक्षक संदीप दळवी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्ष संघटना तळागाळात पोहचविण्यात यावी – मनसेचे निरीक्षक संदीप दळवी

मनसेच्या सावंतवाडी ,वेंगुर्ला तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

सावंतवाडी

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करून पक्ष संघटना तळागाळात पोहचविण्यात यावी असे आवाहन मनसेचे निरीक्षक संदीप दळवी यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.दरम्यान आज मनसेचे व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे पार पडलेल्या बैठकीत सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.यावेळी मा. संदीप दळवी यांनी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेंगुर्ला तालुका अध्यक्ष पदी सनी बागकर ,उप तालुका अध्यक्ष पदी महादेव तांडेल ,महिला तालुका अध्यक्ष पदी स्नेहा कुडाळकर , वेंगुर्ला शहर अध्यक्ष पदी सुरज मालवणकर ,सावंतवाडी उपतालुका अध्यक्ष पदी राजेश मामलेकर व अतुल केसरकर ,आंबोली विभाग अध्यक्ष पदी काशीराम गावडे ,बांदा विभाग अध्यक्ष पदी विष्णू वसकर ,मळेवाड विभाग अध्यक्ष पदी अजित पोळजी ,मळेवाड उपविभाग अध्यक्ष पदी राकेश परब बांदा शहर अध्यक्ष पदी चिन्मय नाडकर्णी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून सावंतवाडी विधानसभेची उर्वरीत कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संदीप दळवी यांनी स्पष्ट केले.

या वेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब ,सावंतवाडी संपर्क अध्यक्ष अमित नाईक , विद्यार्थी सेनेचे मनसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ ,तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत , जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाअध्यक्ष. कुणाल किनळेकर ,कुडाळ विधानसभा सचिव सचिन सावंत , सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे ,अभिमन्यू गावडे ,सतीश आकेरकर ,आरोंदा ग्राम पंचायत सदस्य नरेश देऊलकर ,विजय बांदेकर ,साहिल तळकटकर ,पांडुरंग बुगडे ,अमोल नाईक ,मंदार चोपडेकर ,सहदेव फोडनाईक ,अनिकेत दळवी ,हर्षद कांबळे ,विशाल दळवी आदी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अनेक तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केला.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 6 =