You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सव २०२४;  पर्यटन महोत्सव सेटअपची जोरदार तयारी सुरू!

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४;  पर्यटन महोत्सव सेटअपची जोरदार तयारी सुरू!

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४;  पर्यटन महोत्सव सेटअपची जोरदार तयारी सुरू!

11 ते 14 जानेवारी पर्यंत विविधरंगी कार्यक्रमात नामवंत मान्यवर कलाकारांची उपस्थिती

कणकवली

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो. मात्र २०२४ या वर्षी नगरपंचायतवर प्रशासक असल्याने यावर्षीचा कणकवली पर्यटन महोत्सव नगरपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून “कणकवली पर्यटन महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हे या मगचे उद्दीष्ट आहे. “कणकवली पर्यटन महोत्सव” हा नेहमीच आगळावेगळा ठरतो. कणकवली, देवगड, वैभववाडीचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ११, १२, १३, १४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत.

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ चा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, जि. बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. तर फूड फेस्टिवल उद्घाटन रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

11 जानेवारी –  कणकवली शहरात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ढोल पथक, दशवातर कलाकार, १७ प्रभागांचे चित्ररथ, बैलगाडी ही शोभा यात्रा सायंकाळी ४ वाजता पटकी देवी बाजारपेठ मार्गे उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोरील मैदान पर्यंत जाईल. त्यानंतर बेधुंद ऑर्केस्ट्रा सिने कलाकारांच्या उपस्थितीत होईल.

“चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारांडे, हेमांगी कवी यांची उपस्थिती आहे. तर नामवंत गायकांच्या आवाजात हिंदी – मराठी गाण्यांचा नजराणा असणार आहे. शशांक कल्याणकर टीम लीडर – एक संगीत संध्या, नचिकेत देसाई, के शिरीष, मनीषा जांबोटकर, अंशिका चोनकर, अबोली गिरे, आर. जे. अमित, वंदना पांचाल या कलाकारांची उपस्थिती असणार आहे.

12 जानेवारी – कणकवली ही सांस्कृतिक परंपरा असलेली भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येथील स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. साधारपणे २०० कलाकारांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन जेष्ठ कलाकार सुहास वरुणकर, प्रा. हरिभाऊ भिसे करणार आहेत.  रात्री ८ वाजता सुरु होईल. तत्पूर्वी सायंकाळी ७ वाजता पदर प्रतिष्ठान महिला कलाकार सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सादर करणार आहेत.

13 जानेवारी –  भव्य ऑर्केस्ट्रा होईल, नामवंत टिव्ही कलाकार, कॉमेडी कलाकार असणार आहे, सायंकाळी ७.३० वाजता हा कार्यक्रम असेल. ज्या ज्या क्षेत्रात कणकवली शहरातील नागरिकांनी योगदान दिलेले आहे त्यांचे सत्कार होणार आहेत.

14 जानेवारी –  हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असणार असून शेवटच्या दिवशी हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून असणार आहे. रात्री ८ वा. हा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वा. महोत्सव समारोप केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, आ. नितेश राणे, माजी प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पर्यटन महोत्सव सेटअपची जोरदार तयारी सुरू!
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील पटांगणावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ होणार आहे. याची जोरदार तयारी देखील सुरी असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या स्टेज व स्टॉल उभारणी चे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 16 =