You are currently viewing प्रभाग क्र. ६ परिसरातील मंजूर कामे तसेच प्रस्तावित कामांची लवकरात लवकर निविदा काढून पुर्णत्वास न्यावी – महेश पांचाळ

प्रभाग क्र. ६ परिसरातील मंजूर कामे तसेच प्रस्तावित कामांची लवकरात लवकर निविदा काढून पुर्णत्वास न्यावी – महेश पांचाळ

प्रभाग क्र. ६ परिसरातील मंजूर कामे तसेच प्रस्तावित कामांची लवकरात लवकर निविदा काढून पुर्णत्वास न्यावी – महेश पांचाळ

सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ६ मधील काही कामांची ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊनही अद्यापपर्यंत कामे सुरु झालेली नाहीत, तसेच प्रस्तावित कामे अशा आशयाचे निवेदन सावंतवाडी मुख्याधिकारी यांना भाजपा माजी तालुका सरचिटणीस,महेश अनंत पांचाळ, यांनी सादर केले आहे.

शिल्पग्राम बाजूचे महादेव भाटलेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.

हॉटेल पॉम्पस ते निर्माण भवन समोरुन पाटणकर घर रस्ता डांबरीकरण करणे तरी वरील कामे त्वरीत चालू करणेत यावीत.

प्रस्तावित कामे….

खासकीलवाडा ज्युस्तीननगर सावंत हॉस्पीटल, परब घरापर्यंत रस्ता नुतनीकरण करणे

शिल्पग्राम समोरुन ओटवणे रस्ता सार्वजनिक शौचालय पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे

नवसरणी रोड, ज्युस्तीन रेसीडेन्सी सोसायटी समोर उघड्या नाल्यावर स्लॅब घालणे

ज्युस्तननगर राजू सावंत घरासमोरील खुल्या जागे लगतचे गटर व वॉल बांधकाम करणे

खासकीलवाडा गवस पाणंद खडीकरण व डांबरीकरण करणे.

खासकीलवाडा मुख्य रस्ता ते मातोश्री अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने गटर बांधकाम करणे.

सावंतवाडी ज्युस्तीन नगर देसकर घर ते पिंटो घर गटर बांधकाम करणे

सावंतवाडी ज्युस्तीननगर खराडे घर ते आनंद राणे घर गटर बांधकाम करणे.

सबनीसवाडा एकमुखी दत्तमंदिर जवळील पुलाची दुरुस्ती करणे.

ज्यूस्तीननगर पवार घरासमोरील न.प.च्या मालकीची खुली जागा विकसित करणे.

सावंतवाडी शहरातील निलेश निर्गुण यांच्या घराकडील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.

सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम रोड ते शैलेश सावंत नाला बंदिस्त व दोन्ही बाजूनी काँक्रीटीकरण करणे

हेल्थपार्क रस्त्यापासून रुपेश रसाळ यांच्या घराकडील जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने गटारावर प्रीकास्ट स्लॅब घालून बंदिस्त करणे.

तरी वर नमूद कामे लवकरात लवकर निविदा काढून पुर्ण करावीत. तरी वरील विषयांचा गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करावी अशी विनंती माजी तालुका सरचिटणीस, महेश अनंत पांचाळ, सावंतवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना केली आहे. निवेदन सादर करताना भाई देऊळकर तसेच विलास सावंत उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा