You are currently viewing बांदा केंद्रशाळेत बालिका दिन बनला आनंददिन

बांदा केंद्रशाळेत बालिका दिन बनला आनंददिन

*बांदा केंद्रशाळेत बालिका दिन बनला आनंददिन*

*बांदा*

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून बांदा केंद्र शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ‌. हा दिवस विद्यार्थ्यासाठी आनंददिन बनला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या दिवशी शाळेतील मुलींची सावित्रीबाई यांची वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गीतांचेचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.या दिवशी ‘सारे शिकूया,पुढे जाऊया.’बेटी बचाओ बेटी पढाओ’ अशा घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.
दुपारच्या सत्रात वरच्या वर्गात विद्यार्थ्यांनींनी लहान विद्यार्थ्यांनींच्या हातावर मेहंदी रेखाटन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, उपशिक्षक शांताराम असनकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, प्रदिप सावंत, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी,सपना गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा