You are currently viewing उद्या सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन आणि प्रबोधन जागर कार्यक्रमाचे आयोजन

उद्या सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन आणि प्रबोधन जागर कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील समता प्रेरणा भूमी समन्वय समितीतर्फे ‘प्रेरणा सम्यक समितीची’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन आणि प्रबोधन जागर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी ५ जूनला सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे तर विशेष अतिथी म्हणून सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे फादर ॲलेक्स डिमेलो तर अध्यक्षस्थानी दीपक पनवेलकर आहेत. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, चंद्रकांत जाधव (गोवा), डॉ.उल्हास चांदेलकर (गोवा), सुजित जाधव, डी.डी. कदम (कणकवली), संजय कदम (पडवे), सुरेश जाधव (दोडामार्ग), शामसुंदर जाधव (देवगड), भास्कर जाधव (वैभववाडी), राजेंद्र कदम (मालवण), वाय.जी. कदम (वेंगुर्ले), भावना कदम (सावंतवाडी) आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समता प्रेरणा भूमी समन्वय समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =