You are currently viewing क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले….*

   *”….कवयित्री साहित्यिका…”*

 

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले या एक समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व कवयित्री देखील होत्या. भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणूनही त्यांची ओळख आहे. भारतीय महीलांचे अधिकार सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्यात त्यांनी मुलींच्या शाळेची स्थापना केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक कवितेचीही परंपरा रुजवली. आधुनिक मराठी काव्याची अग्रदूत असेही त्यांना म्हटले जाते. स्त्रीशिक्षणाचा पाया घालताऱ्या सावित्रीबाईंची काव्यसृष्टी अनेक प्रतिभांना साद घालते. समतेसाठी लेखणी झिजवणाऱ्या अनेक प्रतिभावंत साहित्यिकांना सावित्रीबाईंची कविता म्हणजे प्रेरणेचा झरा बनली आहे. निर्झरातून पाझरणाऱ्या एका एका थेंबातून अमृत प्राशन करावे अन् तृप्त व्हावे तशी सावित्रीबाईंची कविता अमृताचा पाझर सोडत आहे. त्यांच्या कवितांचा शोध अन् वेध घेताना अंधाराला प्रकाशमान करणाऱ्या दिव्यासारखी त्यांची कविता दिपवून टाकते.

अंधार पांघरूण युगांव युगे झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्यात सावित्रीबाईंचे आयुष्य खर्ची पडले. समाज सुधारण्याच्या कामी आपल्यासमोर प्रचंड मोठा डोंगर असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उमेद हरली नाही. सावित्रीबाईंनी ज्या काव्यरचना केल्या तर केवळ समाज सुधारणा आज उद्देश नजरेसमोर ठेवून गेले त्यांनी कधीही आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन मांडलं नाही. म्हणून तर शंभर दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कविता आजही समर्पक वाटतात आणि त्यांच्या प्रतिभेचे दर्शन देतात. सावित्रीबाईंचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत त्यापैकी पहिला काव्यसंग्रह *”काव्यफुले”* हा १८५४ साली तर *”बावन्नकशी सुबोध रत्नाकर”* हा १८८२ साली प्रकाशित झाले. आपल्या काव्यातून सावित्रीबाईंनी दैनंदिन जीवनातील अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यातून प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला सहज जाणवून येते. सत्याची कास धरून चालणारे त्यांचे काव्य कधी सामाजिक जाणीव याची जपणूक करत होते तर कधी निसर्गात रममान होऊन निसर्ग कवितांमधून बहरून यायच्या. स्वत्वाचा शोध घेत त्या आत्मपर कवितांमधून व्यक्त व्हायच्या… तर स्वातंत्र्याची चळवळ होऊन स्वातंत्र्य विषयक विचार काव्यातून उतरायच्या. सामाजिक जाणिवांचा स्पर्श सतत मनाला होत असल्याने प्रार्थनापर कविता लिहायच्या अन् समाजाच्या सुधारणेचा स्तर उंचावण्यासाठी बोधपर रचनांमधून समाज सुधारण्याचा प्रयत्न करायच्या. विविधांगी काव्य रचनांमधून त्यांचा काव्यमय प्रवास घडत होता…महिलांना, युवांना प्रेरणा देत होता. सावित्रीबाईंची *”ज्योतिबांची भाषणे”(१८५६)* व *”सावित्रीबाईंची गाणी”(१८९१)* अशीही आणखी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. *”गृहिणी”* नावाच्या मासिकातही त्यांनी काही लेख लिहिले आहेत.

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंच्या कार्यातून अनेकांनी ऊर्जा घेतली होती. या ऊर्जेच्या अखंड स्त्रोताला वंदन करताना सावित्रीबाईंनी असे लिहिले की,

*ज्योतिबांना नमस्कार ! मनोभावे करतसे!*

*ज्ञानामृता आम्हा देई ! आशा जीवन देतसे!*

*माझ्या जीवनात ! ज्योतिबा स्वानंद !*

*जैसा मकरंद ! कळीतला !*

 

ज्योतिबा हे त्यांचे आदर्शस्थान…मार्गदर्शक होते. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. जोतिबांनी त्यांना घरीच शिक्षण दिले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण वगैरे पूर्ण करून शिक्षिका, मुख्याध्यापिका देखील बनल्या. त्यांचा जन्मदिवस ३ जानेवारी हा आज बालिका दिन म्हणून शाळांमध्ये साजरा केला जातो. जोतिबांचा त्याग, धडाडी, प्रज्ञा, अमला करुणा, सामाजिक दायित्वाची त्यांची उत्कटता याची सावित्रीबाईंना सखोल माहिती होती. शूद्र अतिशुद्रांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य ज्योतीप्रमाणे जाळणाऱ्या या महामानवा बद्दल लिहिताना सावित्रीबाई म्हणतात…

*ज्योतिबांचे बोल ! मनात परसा !* *जिवाचा आरसा ! पाहते मी !*

*सेवेच्या भावाने ! सेवा जे करती!* *धन्यता पावती ! मानवात!*

सावित्रीबाईंनी आपल्या काव्य प्रतिभेचा उपयोग बहुजनांच्या कल्याणासाठी केला आहे. शिक्षणाशिवाय बहुजन समाजात, शूद्रांच्या जीवनात बदल घडून येणार नाही, हे त्यांना ज्ञात होते. म्हणून त्यांनी पुढील शब्दात आपले म्हणणे सांगितले आहे…..

*शूद्रांना सांगण्याजोगा ! आहे शिक्षणमार्ग हा !*

*शिक्षणाने मनुष्यत्व ! पशुत्व हाटते पहा !*

*विद्या हे धन आहे रे ! श्रेष्ठ साऱ्या धनाहून*

*तिचा साठा जयापाशी ! ज्ञानी तो मानती जन !*

उठा बंधूनो अति शुद्रांनो जागे होऊन उठा… परंपरेचि गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा… बंधूंनो शिकण्यासाठी उठा… अशी हाक देत सावित्रीबाईंनी अति शूद्रांना देखील शिक्षणाची गोडी लावली सुशिक्षित केले… सावित्रीबाईंनी जा शिक्षण मिळवा ही कविता प्रकाशित करून यातून वंचित लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करून घेण्याची प्रेरणा दिली.

सामाजिक कवितांबरोबर सावित्रीबाईंनी आजूबाजूच्या निसर्गातील बदलांच्या नोंदी हळुवारपणे आपल्या कवितांमधून जपल्या आहेत. त्यांचा “पिवळा चाफा”, “जाईचे फूल”, “फुलपाखरू” या कवितांमधून त्यांनी त्यांची निसर्गाबद्दलची असलेली ओढ प्रेम दाखवून दिले आहे. अत्यंत तरल अशा शब्दकळ्यांमधून या कविता रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

*पिवळा चाफा… रंग हळदीचा*

*फुलला होता हृदयी बसतो…*

*फुल जाई… पहात असता*

*ते मजपाही… मुरका घेऊन*

अशा हळुवार नजाकत भरलेल्या शब्दांमधून सावित्रीबाईंनी निसर्गाबद्दल असलेल्या प्रेम ओढ जपली आहे.

*बावन्नकशी सुबोध रत्नाकर”* हा सावित्रीबाईंचा दुसरा काव्यसंग्रह म्हणजे ज्योतिरावांचे अधिकृत असे काव्यमय चरित्र होय…! एकाव्यसंग्रहात ५२ कडवी आहेत. त्यामुळेच कदाचित त्याचे नाव “बावन्नकशी” असे ठेवले असेल. या काव्यसंग्रहात प्राचीन मध्यम युगीन कालखंडातील इतिहास सांगितला आहे आणि पेशवाई ने केलेले अत्याचार चित्रित केलेले आहेत.

 

*पुढे पेशवाई तिचे राज्य आले… अनाचार देखी अती शूद्र भ्याले*

*स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते… खुणा नाश या ढुंगणी झाप होते..*

 

उपेक्षितांच्या जागरणाचा वसा घेऊन केलेल्या या काव्यरचना अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन जातात आणि शुद्रांवर होणाऱ्या अत्याचाराने आपल्या मनात कुठेतरी खोलवर आपुलकी निर्माण करतात. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून क्रांतीची ज्योतच पेटवली होती. त्या काळात अशा प्रकारचे काव्य कुणाकडूनही लिहिले गेले नव्हते.

सावित्रीबाईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास आणि सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्या बद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

१० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून दोन रुपयांचे डाग तिकीट जारी केले आहे.

२०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे नाव *”सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”* असे करून त्यांच्या स्मृती अजरामर केल्या आहेत.

३ जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने *”गुगल” “डूडल”* प्रसिद्ध करून गुगलने देखील त्यांना अभिवादन केले आहे.

सावित्रीबाई या थोर समाज सुधारक होत्या हे आपण सर्व जाणत आहोत. परंतु त्या एक लेखिका…कवयित्री होत्या आणि त्यांनी मराठी भाषेमध्ये विपुल लेखन केले आहे. हे देखील सर्वांना ज्ञात व्हावे जेणेकरून त्यांची साहित्य संपदा पुन्हा एकदा फुलून बहरून येईल आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांना आपले मार्ग शोधावयास मदत मिळेल हे मात्र नक्कीच…!

 

©[दीपी]

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा