You are currently viewing *पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी*

*खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कलादालनासाठी २५ लाख रु निधी आहे मंजूर*

पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली ५० वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असताना खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून पिंगुळी येथे या आदिवासी लोककलेच्या कलादालनासाठी जिल्हा नियोजन निधी २०२१-२२ अंतर्गत २५ लाख रु निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी अधिवेशन असल्याने भूमिपूजन सोहळ्याला आ.वैभव नाईक यांना उपस्थित राहता आले नाही. या कलादालनाचे काम आता सुरु असून आ. वैभव नाईक यांनी बुधवारी याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.तसेच चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याच्या सूचना केल्या. कलादालनासाठी लागणारा उर्वरित निधी देण्याचे आ.वैभव नाईक यांनी यावेळी आश्वासित केले.
पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी अंत्यत कठीण परिस्थीतीमध्ये ही आदिवासी लोककला जतन करून ठेवली आहे. ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम आणि कलादालन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. या संग्रहालयात ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपारिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल, डोना वाद्य, गोंधळ, पोथराज अशा लोककलेची मांडणी केली आहे.यापुढेही ही लोककला जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी जिल्हावासीयांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. दरम्यान यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला प्रशिक्षणातील चित्रांची पाहणी आ.वैभव नाईक यांनी केली.
याप्रसंगी पद्मश्री परशुराम गंगावणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, गुरुनाथ सडवेलकर, आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा