You are currently viewing स्मृति भाग १७

स्मृति भाग १७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग १७* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *पराशर* स्मृतिमधील अजून काही श्लोक पाहू .

 

*अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम्।*

*सहस्त्रशः समेतानां परिषत्वं न विद्यते ॥*

*यद्वदन्ति तमोमूढा मूर्खा धर्ममतद्विदः।*

*तत्पापं शतधा भूत्वा तद्वक्तृन्नधिगच्छति ॥*

व्रतांचे पालन न करणारा , मन्त्रहीन , केवळ जन्म मात्रेने उपजीविका करणारे ब्राह्मण हजारोंच्या संख्येने जरि एकत्र आले तरि ती ( *धर्म* ) परिषद होत नाही .

अज्ञानाने मूढ , मूर्ख , धर्मास न जाणणारे जेंव्हा धर्माचा उपदेश करतात , तेंव्हा ते पाप शंभर पटीने उपदेश करणार्‍यालाच लागते !

या दोन श्लोकांनी जर जन्मजात ब्राह्मणाचे डोळे उघडत नसतील तर त्यात पराशरांचा काय दोष ? पुढे ते सांगतात , चार अथवा तीन जे वेदांचे विद्वान आहेत , अग्निहोत्री व ब्राह्मणांमधे समर्थ आहेत , तीच परिषद असते . पुढे तर , आत्मविद्येस जाणणारे मुनि , यज्ञांचे यजन करणारे ब्राह्मण ( मला असे वाटते , इथे वास्तुशांती वा नवचंडी करणारे सुद्धा गृहीत नसावेत ! कारण आगोदर वर्णित अग्निष्टोम होम कुठे व हे कुठे ? 🙏) आणि वेदांचे व्रत धारण करणारे स्नातक यातील एक जरि असेल तरी ती परिषद असते . काय ताकद असेल ब्राह्मण्याची ! कल्पनाच केलेली बरी . बोटावर मोजण्या येवढेच सापडावे !!🙏🙏

 

*ब्राह्मणांश्च व्यतिक्रम्य राजा यत् कर्तुमिच्छति ।*

*तत्पापं शतधा भूत्वा राजानमुपगच्छति॥*

ब्राह्मणांचे उल्लंघन करुन राजा जे काही करतो वा करु इच्छितो तर ते पाप शंभर पटीचे होवून राजास लागते .

ही शक्ति ब्राह्मणांचीच ! मुनींची , साधुसंतांचीच ! या श्लोकातून सरकारने ( म्हणजे सरकारी यंत्रणेतील सर्व कर्मचारीच समजावे ! ) पाप करु नये , हेच सूचित करायचंय ना पराशरांना ! असो . श्लोकाचा मतितार्थ वा गूढार्थ बुद्धिमंतांनी समजावा .🙏🙏

या अशा श्लोकांचे नंतर गोसेवोपदेश नावाचा गाईंना सांभाळण्या संबंधीचा अध्याय येतो . त्यात जो मनुष्य गो हत्या करुन लपण्याचा प्रयत्न करतो तो निःसंदेह कालसूत्र नावाचे नरकात जातो , असे सांगितले आहे .शिवाय त्या नरकातून सुटून तो पुन्हा मनुष्य मर्त्यलोकात उत्पन्न होतो ( जन्म घेतो ) आणि सात जन्म नपुंसक , दुःखी , कष्टी होवून राहतो !

खरं सांगू ! मी हे सर्व मानतोच . कारण गर्भाशिवाय नवीन मनुष्य निर्माण करण्या इतपत विज्ञान पुढारलंय , तरी पृथ्वीवर अजून माणसं उपाशी झोपतात , हे विसरुन चालू शकेल आपल्याला ? कशास विज्ञानाची फुशारकी मानायची ? आणि जे अध्यात्म मार्गाने कुणालाही त्रास न देता विश्वकल्याणाच्या अपेक्षा करत जगतात त्या साधूसंतांच्या हत्या नशेत करायच्या ? खरंच आम्ही पुढारलो आहोत ! पुरोगामित्व असे असते ? असो , आम्ही पुन्हा एक होवून भारताची मान जगात उंचवून ताठ मानेन जगू , अशी आशा बाळगतो . अजून कशी क्षुल्लक गोष्ट नमूद करावी याचा नमुना पहा पुढील श्लोक ,

 

*गोवृषाणां विपत्तौ च यावन्तः प्रेक्षका जनाः ।*

*न वारयन्ति तां तेषां सर्वेषांपातकं भवेत् ॥*

गाई आणि बैल यांच्या विपत्तीत जेवढे मनुष्य प्रेक्षक असतात व जर ते त्या विपत्तीचे निवारण करत नसतील तर त्या सर्वांना पापी ( दोषी वा घातकी ) मानावे .

किती बारीक गोष्ट सांगितली ! जी गोष्ट गाईबैलांसाठी असावी , ती आम्ही मनुष्य वा साधुसंतांसाठी आणि देशातील कोरोना योद्धांसाठी ( पोलिस परिवार , वैद्यकीय परिवार आणि पत्रकार परिवार असे सगळेच ) तसा कायदा आणून अंमलबजावणी करत नाही , तोपर्यंत आम्ही खरंच पुरोगामी का हो ? आमचे कायदे अपूर्ण आहेत का पाळणारे अपूर्ण आहेत ? खरंच जगातली उत्तम लोकशाही लयास चालली आहे का ? याचाच विचार विचारवंतांनी करावयाची गरज आहे , असे वाटते .

विनंती इतकीच , पराशर स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =