You are currently viewing श्रीराम विद्या मंदिर मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि आठवणींना उजाळा
Oplus_16908288

श्रीराम विद्या मंदिर मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि आठवणींना उजाळा

तब्बल अठरा वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

भोसरी –

भोसरी येथील श्रीराम विद्या मंदिर सण २००७-०८ या सालातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा व तत्कालीन शिक्षकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यानिमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना नवा उजाळा मिळाला. यावेळी सर्वांच्या प्रेरणास्थान राजश्री ढमाले, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे सर , सहशिक्षक सुनिता भोसले, संदीप मोरे सर, रामचंद्र राक्षे सर, गुलाब गवळी सर , मनीषा गायकवाड मॅडम, रेखा देवकर मॅडम ,लक्ष्मी मुंडे मॅडम व संदीप रेटवडे सर हे शिक्षक आवर्जून उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता शाळेची घंटा वाजली व सर्व विद्यार्थी वर्गामध्ये येऊन बसले व वर्गात आलेल्या सर्व शिक्षकांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षकां वर गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वर्गात आकाशगंगा या गीतावर अतिशय भावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी केले. या स्वागताने सर्व शिक्षकांची मने हेलावून गेली. शाळेच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. पांडुरंग गुळवे तसेच माजी विद्यार्थी संघाचे प्रेरणास्थान कै. खंडू ढमाले सर व मातृहृदयी कै.उमाताई गुळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला.तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचा या बॅच तर्फे उचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे सर यांनी शाळेत स्थापन केलेल्या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेचा हेतू व त्याची चाललेली वाटचाल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांनी या माजी विद्यार्थी संघात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून संघ मोठा कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेतील उत्साही शिक्षिका , प्रत्येक कामात आघाडीवर असणाऱ्या व विद्यार्थ्यांवर आईसम प्रेम करणाऱ्या शिक्षिका सुनीता भोसले मॅडम यांनी स्वर्गात आकाशगंगा या गीतावर नृत्य सादर करून मुलांनाही नृत्य करण्यास प्रवृत्त केले . त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर यांनी “घंटा झाली टण टण” या गीतावर मुलांसमवेत नृत्य सादर केले.या दोन्हीही गीतांचा मुलांनी निखळ आनंद घेतला. मनीषा गायकवाड मॅडम यांच्या वर्गाने यावर्षी स्वर्गात आकाशगंगा या गीतावर अनेक पाहुण्यांचे विशेष करून परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले होते. आपल्या मनोगतात ती आठवण सांगताना गायकवाड मॅडम भावूक झाल्या.

नंतर मुलांनी काही फनी गेम्स घेऊन पुन्हा बालवयातील आनंद घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी घबाड कुंड या चित्रपटाचं प्रमोशन या चित्रपटातील बालकलाकारांसहित करण्यात आले.

या बॅचच्या वतीने शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देण्यात आली. तसेच आर्थिक स्वरूपात निधी सुपूर्द करण्यात आला. भविष्यात शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या उभारणीमध्ये व प्रगतीमध्ये आमचा वर्ग कायम आघाडीवर राहील असे आश्वासन दिले.

यानंतर शाळेचा माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध केटरर्स मानसपुत्र सचिन कोळेकर यांच्याकडून छान पैकी सुरुची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी काशीद व संध्या बुधर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन निलेश केदारी यांनी केले. तर, विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत विक्रम ठाकूर यांनी व्यक्त केले.

या सर्व मनमोहक प्रसंगांना टिपण्याचं काम शाळेचा माजी विद्यार्थी व मानसपुत्र फोटोग्राफर सौरभ आगळे व त्याची सुविद्य पत्नी वर्षा आगळे या दोघांनी अप्रतिम पणे केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टॅक्स कन्सल्टंट पल्लवी काशीद, इंजिनीयर संध्या बुधर, प्रियंका भोसले इंजिनीयर , केतन वाळके ॲड .प्रवीण गावडे, बिल्डर अमोल पोखरकर बिल्डर प्रताप थोरात यांनी अप्रतिमपणे केले.

एक आगळावेगळा सोहळा अनुभवण्याचा योग सगळ्यांना आला. या स्नेह मेळाव्यासाठी विशेष सहकार्य संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे यांचे लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा