You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग

सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग

*सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग*

*मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर,नंदू परब सुनील नाईक यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र*

*खुद्द मुंबईतील नेमलेले पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या आरोस मध्येच पदाधिकारी यांचे राजीनामे*

मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक सुजय नाईक यांचा सह विभागातील 30 कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनाही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका व बडव्यांचा व त्याच बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे गुंडाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपलीच वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं वागून चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या कुजक्या राजकारणाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 10 =