महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी कणकवली चे प्रशांत वर्दम
*सरचिटणीस पदी कुडाळ चे संतोष पालव,संपूर्ण निवडप्रक्रिया झाली बिनविरोध
कणकवली
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी कणकवली येथील ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा सरचिटणीस पदी कुडाळ तालुक्यात संतोष सुधाकर पालव यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग ची पंचवार्षिक निवडणूक आज ३१ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था कार्यालय ओरोस येथे पार पडली. यावेळी उपाध्यक्ष श्री संदिप रमाकांत गवस सावंतवाडी, कार्याध्यक्ष श्री प्रसाद विजय ठाकुर – सावंतवाडी, महिला उपाध्यक्ष, श्री रेश्मा गोवळकर, देवगड, कोषाध्यक्ष श्री रविंद्र प्रभुदेसाई मालवन, सहसचिव, प्रविण नेमण वेगुर्ला, संघटक उज्वल झरकर- देवगड, महिला संघटक, सुजाता जगताप दोडामार्ग, कायदेविषयक सल्लागार श्री शशिकांत गुरव वैभववाडी यांची निवड करण्यात आली.
या निवडणुक प्रकियेमध्ये श्री पुरूषोत्तम नारायण हरमलकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले, या सोबत मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे, मावळते सरचिटणीस श्री गणेश बागायतकर, ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन श्री अमित दळवी, व्हा चेअरमन श्री नितेश तांबे, मावळते जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री मनमोहन धुरी, श्री मंगेश राणे, व सर्व तालुका अध्यक्ष,सचिव व जिल्हयातील बहुसंख्य ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बहुसंख्य ग्रामसेवक व महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार जिल्हा संघटनेमार्फत करणेत आला. यावेळी नुतण जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत वर्दम यांनी जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांचे प्रलबिंत प्रश्न, अडीअडचणी सोडवणे व जिल्हा संघटना एकसंघ ठेवणे हे प्रमुख उददीष्ट आहे. तसेच जिल्हयातिल ग्रामसेवकांच्या हीताचे सर्व निर्णय करण्यात येतील या बाबतची ग्वाही आपल्या अध्यक्ष भाषणात दिली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे सरचिटणीस श्री गणेश बागायतकर व चेअरमन अमित दळवी यांनी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.