You are currently viewing उच्चशिक्षित व प्रसिद्ध व्याख्याते श्री. सत्यवान रेडकर यांचे सावरकर नगर, ठाणे येथे व्याख्यान संपन्न

उच्चशिक्षित व प्रसिद्ध व्याख्याते श्री. सत्यवान रेडकर यांचे सावरकर नगर, ठाणे येथे व्याख्यान संपन्न

*उच्चशिक्षित व प्रसिद्ध व्याख्याते श्री. सत्यवान रेडकर यांचे सावरकर नगर, ठाणे येथे व्याख्यान संपन्न*

कोकण तसेच महाराष्ट्रात “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीमार्फत महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोणत्याही स्वरूपाचे मानधन न घेता जवळपास २२५ निःशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांद्वारे शैक्षणिक परिवर्तनाचा ध्यास उराशी बाळगून अविरतपणे समाज प्रबोधन करणारे, प्रसिद्ध उच्चशिक्षित व्याख्याते मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी सावरकर नगर, ठाणे येथे कोचिंग क्लासेस संचालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आयोजित निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित केले. यावेळेस श्री. विजय कोशिमकर, अध्यक्ष, अमेय सोसायटी, कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे सचिव, श्री. सचिन सरोदे, उपाध्यक्ष, प्रकाश पाटील, इंजि. अमोल जगताप सर, सौ. संध्या चिचकर, श्री. राजू शिरोडकर आदि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा