You are currently viewing वनौषधी वैद्य हे पिढ्यान पिढ्या गावाचे वैद्य

वनौषधी वैद्य हे पिढ्यान पिढ्या गावाचे वैद्य

सावंतवाडी :

 

वनऔषधी उपचारांद्वारे गुणांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य गावाचे आरोग्य दूत तसेच गावाचे भूषण आहे. त्यांच्या त्यांच्या या निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन गावठणवाडी कला क्रीडा मंडळाने त्यांचा केलेला सन्मान आदर्शवत असुन कौतुकाची ही थाप त्या वैद्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे गौरवोद्गार सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी काढले.

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ओटवणे गावातील वनऔषधी देणाऱ्या वैदयाच्या सन्मान सोहळ्यात राजन पोकळे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सरपंच आत्माराम गावकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजीत कोरगावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मुंबई मंडळाचे संपर्कप्रमुख दशरथ गावकर, देवस्थान मानकरी अण्णा मळेकर, ग्रामपंचायत सदस्या संजना जाधव, समिक्षा गावकर, मनाली गावकर, अस्मिता भगत, नामदेव गावकर, बाळकृष्ण भगत, मंगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शांताराम बिरोडकर, रामचंद्र (काका) सखाराम नाईक, बापू सदू गावकर, महादेव भोरू गावकर, धाकू रामचंद्र बोर्ये, शांताराम जयराम झारापकर, दत्ताराम विठ्ठल गावकर, बाबा महादेव चव्हाण, बापू बाबली गावकर, आत्माराम शिवराम गावकर, गोविंद शिवराम भिसे, गुंडू फटू तारी, रामचंद्र विष्णू सोनार, आना धोंडीराम गावकर, नरेंद्र लक्ष्मण कविटकर, श्रीम. आनंदी कृष्णा गावकर, नारायण यशवंत वर्णेकर या सर्वांचा आध्यत्मिकतेचे प्रतिक असलेली पांढरी टोपी, सुपारी रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ओटवणे गावातील असलेले हे वैद्य गेली पिढीजात असुन औषधी झाडाची पाने, साल, मुळे, फुले रुग्णांना देऊन त्यांना आरोग्यमुक्त करतात. या उपचार पद्धतीला अध्यात्मिक व धार्मिकतेचीही जोड आहे. गेली अनेक वर्षे या वैद्याची विना मोबदला ही सेवा सुरु आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गावठणवाडी मंडळाने त्यांचा कृतज्ञता सन्मान आयोजित केला होता. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या या सेवेचे कौतुक करीत त्यांच्या पुढच्या पिढीनेही हीअविरत सेवा पुढे सुरु ठेवावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश चव्हाण यांनी तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 15 =