You are currently viewing डॉ. रामदास रेडकर यांच्या निवासस्थानी उद्या  साई पालखी उत्सव सोहळा

डॉ. रामदास रेडकर यांच्या निवासस्थानी उद्या  साई पालखी उत्सव सोहळा

उपस्थित राहण्याचे डॉ.रामदास रेडकर व कुटुंबियांचे आवाहन

दोडामार्ग

गोवा ते शिर्डी अशी साई परिक्रमा तब्बल दहा वेळा पूर्ण केलेल्या श्री साई भक्त परिवार म्हापसा गोवा च्या साई पालखीचा उत्सव सोहळा साई भक्त डॉ. रामदास रेडकर यांच्या कोनाळकट्टा येथील राम सरीता निवासस्थानी पार पडणार आहे.

हा पालखी उत्सव सोहळा १३ एप्रिल रोजी होणार असून या निमित्त सकाळी श्रींची पूजा, अभिषेक, दुपारी आरती, महाप्रसाद तर सायंकाळी ग्रामस्थांचे भजनादी कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाला संस्थापक प्रशांत वेर्लेकर, सचिव आनंद दळवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहून श्री साईंचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन डॉ रामदास गवस व कुटुंबीय तसेच व्यवस्थापक कला क्रीडा मंडळ कोनाळकट्टा यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा