You are currently viewing करणीच्या बहाण्याने महिलेवर केला अत्याचार…

करणीच्या बहाण्याने महिलेवर केला अत्याचार…

आजरा येथिल घटना; सावंतवाडीच्या दोघांसह चौघावर गुन्हा दाखल…

सावंतवाडी
मी संताचा अवतार असून, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुमच्या घरी करणी केल्याचे सांगत सिरसंगी (ता. आजरा) येथील एकाने विवाहितेवर सहा वर्षांपासून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेने याबाबतची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिली. बाळू धोंडिबा दळवी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला सोमवार (ता. १४)पर्यंत कोठडी मिळाली आहे. जादूटोणा करण्यासाठी दळवीला मदत करणाऱ्या लक्ष्मण सुतारसह सावंतवाडीच्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० या कालावधीत घडला. या प्रकरणात कथित बुवा बाळु धोंडीबा दळवी, लक्ष्मण सुतार (दोघेही रा.आजरा-शिरंसंगी) व सावंतवाडी तालुक्यातील दोघा संशयितांचा समावेश आहे. याबाबतची तक्रार नेसरी येथील विवाहितेने दिली.

पीडित महिलेने याबाबतची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिली. जादूटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. नेसरी पोलिसांनी सिरसंगी येथून बाळू दळवीला अटक केली. गडहिंग्लज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two − one =