डॉ.अभिजित चितारी यांची बदली तात्काळ रद्द करा

डॉ.अभिजित चितारी यांची बदली तात्काळ रद्द करा

बदली रद्द न केल्यास जनआंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा ह्रदयरोग तज्ञ कार्यरत असलेले डॉक्टर अभिजीत चितारी यांची ओरोस येथे करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी.

डॉक्टर अभिजित चितारी यांची सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यातील जनतेला गरज असून त्यांची बदली रद्द करण्यात यावी. अन्यथा या विरूध्द नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा मनसेचे माजी उपजिल्हाध्यश अँड.अनिल केसरकर, राजू कासकर व शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा