You are currently viewing होडावडे येथे विहीरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाला जीवदान…

होडावडे येथे विहीरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाला जीवदान…

होडावडे येथे विहीरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाला जीवदान…

वेंगुर्ले

होडावडे येथील प्रसाद मराठे यांच्या काजू बागेत असलेल्या विहिरीत लहान गवा पडला. ही घटना काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. तेथील ग्रामस्थ अजित शरद नाईक यांनी विहिरीत उतरून त्या गव्याला जीवदान दिले.
अजित नाईक हे त्या ठिकाणी कामानिमित्त बागेत गेले असता त्यांनी विहिरीत पाहिले असता एक लहान गवा रेड्याचे पिल्लू विहिरीत पडले होते, ते पूर्णपणे प्राण सोडण्याच्या तयारीत होते. परंतु जीव धोक्यात घालून अजित नाईक यांनी स्वतः विहिरीत उतरून सदर गवाड्याच्या पिल्लाचे प्राण वाचवले, या विहिरीतील पाणी हे कठड्या बरोबर काटोकाठ असल्याने गवा रेड्याच्या पिल्लाला त्यांनी स्वतः बाहेर काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =