You are currently viewing मालवणात जिओ व बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क विस्कळीत 

मालवणात जिओ व बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क विस्कळीत 

मालवणात जिओ व बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क विस्कळीत

दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क लवकरात लवकर सुरळीत करावे; ग्राहकांची मागणी..

मालवण

मालवण शहर व परिसरात सध्या जिओ व बीएसएनएल नेटवर्क विस्कळीत झाले असून चांगले नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. कॉलिंग व इंटरनेट व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

मालवण शहरात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल व जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क संथ गतीने चालत आहे. व्हाट्सअपवरील साधा टेक्स्ट मॅसेजही सेंड होताना विलंब होणे, इंटरनेट साईट ओपन न होणे यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. तसेच जिओ सिम वरून केलेले कॉल खंडीत होणे, आवाज अस्पष्ट येणे किंवा समोरील व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे अशा समस्या ग्राहकांना भेडसावत आहेत. कॉल मधील समस्या तसेच मोबाईल इंटरनेट सेवेतील विस्कळीतपणा यामुळे अनेकांची ऑनलाइन व मोबाईलद्वारे होणारी कामे दिरंगाईने होत आहेत. यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. दुसरीकडे वोडाफोन- आयडिया, एअरटेल व इतर कंपन्याची मोबाईल इंटरनेट सेवा सुरळीत व चांगल्या गतीने सुरु आहे. त्यामुळे जिओ व बीएसएनएल कंपनीची ठप्प पडलेली नेटवर्क सेवा लवकरात लवकर सुरळीत व्हावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा