You are currently viewing तेंडोली ग्रा.प. सदस्य कौशल राऊळ यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

तेंडोली ग्रा.प. सदस्य कौशल राऊळ यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन*

*तेंडोली भोमवाडी येथील अनलादेवी मंदिराकडे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन

तेंडोली येथील अपक्ष ग्रामपंचायत सदस्य कौशल राऊळ यांच्यासमवेत अनेक नागरिकांनी व युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. तेंडोली येथे झालेल्या या प्रवेशात आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना पक्षात फूट पडली असली तरी नागरिक आणि युवकांचा ओघ हा उद्धवजी ठाकरे यांच्या समवेतच आहे. अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत,प्रवेश कर्त्यांना पक्षात मानसन्मान दिला जाईल. त्याचबरोबर गावातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी मंजूर केला जाईल असे आ.वैभव नाईक यांनी यावेळी आश्वासित केले.
दरम्यान यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तेंडोली भोमवाडी येथील अनलादेवी मंदिरा नजीक पेव्हर ब्लॉक बसविणे निधी ५ लाख या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे काम मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला. शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
प्रवेश कर्त्यांमध्ये अनंत गावडे,निलेश गावडे,महेश गावडे, नितेश गावडे, संजय गावडे, गुणाजी गावडे, लक्ष्मण गावडे, प्रवीण गावडे, नरसिंह प्रभू ,रवींद्र परुळेकर,परशुराम गावडे,उदय गावडे, सागर खानोलकर,सदानंद खानोलकर,किरण खानोलकर, निलेश खानोलकर, प्रवीण खानोलकर, संतोष खानोलकर, धोंडी खानोलकर यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, शिवसेना नेते अतुल बंगे, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, गुरुनाथ पारकर,सुवर्णा तेंडुलकर,अरुणा राऊळ ,प्रियांका परब, सायली सर्वेकर, मोहन राऊळ, राधाकृष्ण परब, बाळकृष्ण राऊळ, यशवंत राऊळ,महादेव राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व तेंडोली ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =