You are currently viewing तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी उदय दुधवडकर…

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी उदय दुधवडकर…

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी उदय दुधवडकर…

तर उपाध्यक्षपदी संजय शेळके:तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

वैभववाडी

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर यांची तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत तर सचिवपदी संजय खानविलकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी श्रावणी कॉम्पुटर सेंटर, तळेरे येथे मावळते अध्यक्ष डी.जे.मारकड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सुरुवातीला उपाध्यक्ष उदय दुधवडकर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत केले.तर अध्यक्ष डी.जे.मारकड यांनी प्रास्ताविक करून सभेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्वांशी विचार विनिमय करून सर्वानुमते नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

*नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे :-*
अध्यक्ष- उदय दुधवडकर तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत तर सचिवपदी संजय खानविलकर, सहसचिव- सचिन राणे, खजिनदार- निकेत पावसकर, सल्लागार म्हणून म्हणून डी.जे.मारकड, संजय भोसले, प्रमोद कोयंडे आणि सदस्य म्हणून उत्तम सावंत, ऋषीकेश मोरजकर, अनिल राणे, महेश तेली, अस्मिता गिडाळे, प्रा.प्रशांत हटकर, सतिश मदभावे, संतोष नाईक, सौ.नेत्रा पावसकर, सौ.पल्लवी सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

त्यानंतर ६ जानेवारी रोजीच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील जन्मस्थानी असलेल्या स्मारकामध्ये जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे. त्यानंतर सकाळी १० वाजता तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात पत्रकार दिन समारंभ आणि पत्रकार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

तसेच ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि श्रावणी कंम्प्युटर सेंटर, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकात आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवून साफसफाई करणे.

तसेच पोंभुर्ले तिठ्यावरती तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने नवीन स्वागत फलक लावणे. त्याचबरोबर दर तीन महिन्यांनी पत्रकार संघाची सहविचार सभा आयोजित करणे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्या संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

सदरची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला पत्रकार संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. शेवटी आभार निकेत पावसकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा