You are currently viewing २६ डिसेंबर रोजी हडपिड येथे “श्री दत्त जयंती उत्सव”

२६ डिसेंबर रोजी हडपिड येथे “श्री दत्त जयंती उत्सव”

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड – देवगड येथे “श्री दत्त जयंती उत्सव” २६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होम हवन ९ ते ११ लघु रुद्र, ११ ते १२ पालखी, सोहळा, दुपारी १२:१५ वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद, ३ ते ४ अक्कलकोट यात्रा भाग्यवंत सोडत, ४ ते ७ नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता पंचम ग्रुप प्रस्तुत अभंग गाथा भाव भक्ती गीत सुरेल मैफिल गायक प्रसाद जाखी. सदर कार्यक्रमास सहकुटुंब स्वामीभक्त मित्रपरिवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अक्कलकोट भुषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानीत संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर व संस्थापक अध्यक्ष श्री.प्रभाकर राणे, स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई, श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड गाव समीती यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 17 =