You are currently viewing दोडामार्ग न्यायालयात आयोजित लोकअदालतीत 19 प्रकरणे सामंजस्याने निकाली

दोडामार्ग न्यायालयात आयोजित लोकअदालतीत 19 प्रकरणे सामंजस्याने निकाली

दिवाणी न्यायाधीश स्वाती पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली लोकअदालत

दोडामार्ग
दोडामार्ग तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दोडामार्ग न्यायालयात आयोजित लोकअदालतीत 19 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. वादपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण 225 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातून 1 लाख 19 हजार 966 रुपये रक्कम सामंजस्याने व तडजोडीने वसुल करण्यात आली.
दिवाणी न्यायाधीश स्वाती पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकअदालतीत पॅनल सदस्य म्हणून अॅड सोनू गवस यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा