*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग १४*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
मी या आगोदर एक श्लोक दिला होता की , ” आत्महत्या हे पाप आहे ” या विषयीचा . आज तसाच सुंदर श्लोक ऋषि पराशरांनी दिलेला .
*अतिमानादतिक्रोधात् स्नेहाद्वा यदि वा भयात् ।*
*उद्बध्नीयात् स्त्री पुमान् वा गतिरेषा विधीयते ॥*
*पूयशोणितसंपूर्णे अन्धे तमसि मज्जति ।*
*षष्टिं वर्षसहस्त्राणि नरकं प्रतिपद्यते ॥*
अति मानामुळे , अति क्रोधामुळे , स्नेहकारणाने ( प्रेमामुळे ) अथवा भयामुळे जर कुणीही स्त्री वा पुरुष स्वतःस फाशी लावून घेत असेल तर त्याची ही गति होते .👇
अशी स्त्री वा पुरुष पू आणि रक्त यांनी भरलेल्या घोर अंधकारात गोते खातो . तसेच साठहजार वर्षांपर्यंत नरकात पडतो .
यात नरक , रक्त व पू यांचा घोर अंधकार , हे शब्द आधिभौतिकवाद्यांच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत ! सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते ती ही की आत्महत्या माझ्या संस्कृतीला मान्य नाही . दुसरे असे की आत्महत्येबद्दल भीती निर्माण व्हावी म्हणून दुसरा श्लोक असावा ! एवढे मानले अक्कलवंतांनी ! तरी चालेल . ज्यांची बुद्धि असते त्यांचा अभ्यास वेगळा असतो अक्कलवंतांपेक्षा ! पण मी मानतो ऋषि जे लिहीतात ते . भले भारतातले राजकारणी कितीही ओरडोत स्मृतींचे नावाने !🙏🙏 पृथ्वीचा गोल घेतला आणि त्यावर भारताचे मध्यातून एक सळई टाकली तर ती थेट विरुद्ध बाजूला मेक्सिकोमधे निघते . तो एकवीसाव्वा नरक त्या काळात गणला जायचा . ज्याला पुराणात *मक्षिका देश* म्हणून संबोधले होते . अहि रावण व महि रावण हे इथलेच ! येथपर्यंत सुग्रीवाने आपले हेर सीतामातेच्या शोधासाठी पाठवले होते ! आता भारताचे पश्चिम दिशेने मेक्सिकोपर्यंत देश मोजा व तेथे कशा प्रकारचा आतंक आहे , त्याची गणना नरक यातना म्हणूनच करावी ना ?
एवढ्या पाच वर्षात जसा आयुर्वेद वृद्ध होतोय तसे एक सहज औषध पुढे आले ” सुवर्णप्राशन विधी ” . यात जन्माला आलेल्या मुलाला सोनं चाटवायचं . काय होतो याचा उपयोग ! मी लहान असतांना प.पू. भिषग्वर सर्वश्री वेणीमाधवशास्त्री जोशी व माझे आजोबा यांचे संभाषणातला अंश सांगतो . ” भाऊसाहेब , सुवर्ण चाटणारा मुलगा कधीच आत्महत्येचा विचार करत नाही . उलट ज्याला आत्महत्या करावीशी वाटते त्यास सुवर्ण द्यावे , तो विचार सोडून देईल आत्महत्येचा ! ” . हे त्यांनी सांगितलेले माझ्या अजून लक्षात आहे . पण ते ही आयुर्वेदीय वक्तव्य भिषगाचार्य ऋषिवरांचेच ! ( ते ३०x पोटेन्सीचे होमिओपॅथीचे लिक्वीड सुवर्णमात्रा म्हणून वापरायचे ). आता तर खात्री होईल ना माझ्या संस्कृतीतच प्रयत्न केले गेले माणूस विनाकारण मरु नये म्हणून ! आणि ते ही स्मृति लिहिणारे वा आयुर्वेद लिहिणार्या ऋषिंकडून ! त्यांनी दिलेल्या ह्या दानाने आम्ही तृप्त होवून त्यांची आठवण म्हणून तर्पण न केले तर आम्ही पशूच ना ! पण त्याही पेक्षा हीन उपमा हवी ! कारण देणार्याची आठवण पशुसुध्दा ठेवतात हो ! आम्ही याच जन्मात विसरतो . आज कोरोनाचे संकट सर्व जगात पसरले आहे . त्यात विनाकारण कुणी मृत्युमुखी पडू नये म्हणून जे पोलीस , वैद्यकीय कर्मचारी , सफाई कर्मचारी आणि पत्रकार बांधव स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत , त्यांनाच आजचा लेख समर्पित करतो .💐💐 आणि थांबतो .
विनंती इतकीच , पराशर स्मृति वाचनीय आहे . उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी*
*Advt Link👇*
————————————————–
🎁🛍️🛒👜👛 👝🎒🧤🥻👔👖🧥💅🏻
*🎉🎊आनंदोत्सव २०२३🎊🎉*
*🛍️प्रदर्शन व खरेदी🛍️🕺*
२८, २९, ३० डिसेंबर २०२३
⏰वेळ : दु.३.०० ते रात्रौ ९.००*
🎴स्थळ : आर.पी.डी हायस्कुल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
▪️डिझायनर साड्या 🥻
▪️डिझायनर कपडे 👗
▪️ज्वेलरी 💍
▪️इंटेरिअर प्रॉडक्ट्स
▪️मसाले 🧂
▪️टॅरो कार्ड रिडर 🎴
▪️पॉटरी
▪️पेंटीग्स
▪️रेडीमेड ड्रेस 👚
▪️मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल🥘
▪️लाईव्ह पोट्रेट 👩🏻
▪️कॅरिकेचर
▪️टॅटु व मेहेंदी स्टॉल्स❤️🩹
*🃏गंजिफा🃏*
*प्राचिन खेळ (१६ वे शतक)*
जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता. तोच खेळ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे.
*आयोजक – पौर्णिमा रविकांत सावंत*
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – 9067927762
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*