You are currently viewing शहराच्या विकासासाठी न.पं.कटिबद्ध; समीर नलावडे

शहराच्या विकासासाठी न.पं.कटिबद्ध; समीर नलावडे

कणकवली

कणकवली शहराच्या विकासाच्या ​दृष्टीने रस्ते,​ ​वीज तसेच गार्डन अशा आदी कामाचा शुभारंभ न.पं.च्या माध्यमातून करण्यात आला आहे. शहराच्या विकासासाठी न.पं. कटिबद्ध असून नागरिकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे हे फलित आहे.विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र असून यासाठी कणकवलीतील नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.तर आपल्या मागणी पैकी बाकडी आजच याठिकाणी लावली जातील.तर उर्वरित मागण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले.
नाथपैनगर पश्चिम येथील म्हाडेश्वर हॉस्पिटल ते राणे घर जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण रस्ता रुंदीकरण व मजबुती करण्याच्या कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ७४.५४ लाख रु.च्या नगरोत्थान निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + seventeen =