*सावंतवाडीत संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी वटसावित्री सभागृहात उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील परिसराची साफसफाई करण्यात आली नंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन श्री व सौ संदीप बांदेकर यांनी सपत्नीक केले व नंतर आरती करून प्रसाद वाटण्यात आला.
यावेळी परीट समाजाची बैठक घेण्यात आली. या परीट समाजाच्या बैठकीत उपस्थित परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर,जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,ज्येष्ठ सल्लागार मधुकर मोरजकर, देवेंद्र होडावडेकर, मनोहर रेडकर, जगन्नाथ वाडकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, उपाध्यक्ष स्वप्निल कदम, सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, शहराध्यक्ष दयानंद रेडकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले संत गाडगेबाबांचे विचार, शिक्षणाविषयीची तळमळ व स्वच्छतेचा संदेश हे मूलमंत्र अंगी जोपासावे तरच खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक होईल व लवकरच परीट समाजाचा वधू वर कोकण मेळावा घेण्या संदर्भात विचार मांडला. तालुकाध्यक्ष राजू भालेकर म्हणाले संत गाडगेबाबांच्या नावाने संत गाडगेबाबा भवन उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे व या कार्याला माझा मोलाचा सहभाग असेल.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, ज्येष्ठ सल्लागार मधुकर मोरजकर, देवेंद्र होडावडेकर, मनोहर रेडकर, संजय होडावडेकर व योगेश आरोलकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला नंतर कुटीर रुग्णालय व राणी जानकीबाई सुतिका गृह येथे फळे व प्रसाद वाटप करण्यात आला व नंतर किर्तन,भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश होडावडेकर, जगन्नाथ वाडकर, योगेश आरोलकर, अनिल होडावडेकर, स्वप्निल कदम, मनोहर रेडकर, सुरेंद्र कासकर, रितेश चव्हाण, भगवान वाडकर, किरण वाडकर, सुरेश पन्हाळकर, दयानंद रेडकर, जितेंद्र मोरजकर, प्रदीप भालेकर, वरुण भालेकर, सुनील वाडकर, महेश तळवणेकर, संदीप बांदेकर, महेश बांदेकर, सुनील होडावडेकर, लक्ष्मीदास आजगावकर, प्रवीण मोरजकर, जय भालेकर व परीट समाजाच्या सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रदीप भालेकर व योगेश आरोलकर यांनी व आभार जितेंद्र मोराजकर यांनी मानले.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*