You are currently viewing ह्रदयातील भगवंत राहीला ह्रदयातून उपाशी

ह्रदयातील भगवंत राहीला ह्रदयातून उपाशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*ह्रदयातील भगवंत राहीला ह्रदयातून उपाशी*

 

*कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी*

*हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी*

असे आपण नेहमी म्हणतो. देवा तुझ्या दर्शनासाठी मी दारोदार वणवण भटकत आहे परंतु तू मला भेटतच नाहीस, असा याचा अर्थ आहे. माझ्या हृदयात तुझा वास आहे हे जाणूनही तुझ्या दर्शनाचा मी भुकेला राहिलो आहे. असे का बरे? याचे उत्तर एकच

माझा देहाभिमान. माझा देह, शरीर हे आत्म्यावरचे एक आवरण आहे, ते दृश्य आहे

आणि त्या देहालाच आम्ही सर्व माणसे मी, माझे समजून रोजच्या जीवनात वावरत असतो. या देहावरच्या प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे मला आत्मानात्मविवेक बुद्धीचा संपूर्ण विसर पडला आहे. म्हणूनच निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन तुझे दर्शन करण्याचा मी व्यर्थ प्रयत्न करत असतो. माझ्या मनाला जराही शांती लाभत नाही.

गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारखे ग्रंथ वाचून आम्हा सामान्यांना इतके समजले आहे की, प्रत्यक्ष परमात्मा आत्मस्वरूपाने आपल्या देहातच वास करून आहे. आम्हा करंट्यांना तो दिसत नाही, किंबहुना आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठीच द्वैताचा निरास झाला पाहिजे. एकदा का द्वैतभावना विरून गेली की उरतो तो फक्त हरी. त्याला कुठेही धुंडाळावे लागत नाही.

प्रश्न असा आहे की यासाठी उपाय काय? सगुणोपासना आणि नामस्मरण हा परमेश्वरा प्रति पोहोचण्याचा आम्हा सामान्यांसाठी एकमेव सुलभ मार्ग आहे.

*सगुणोपासना*

सगुणाची मनोभावे उपासना करता करताच भक्त निर्गुण निराकार परमेश्वरा प्रति कधी पोहोचतो हे त्याला कळतही नाही.

संत तुकाराम महाराजांनी यासाठीच परमेश्वराला एक रूप दिले. पांडुरंगाचे वेड लागलेला संत तुकाराम हा एक सर्वसामान्य प्रापंचिक माणूस, भक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अभंग रचना केली आणि त्यातून त्यांनी जगजेठी नारायणाचे सुंदर रूप सर्वसामान्यांना दाखविले. ते लिहितात,

*सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी*

*कर कटावरी । ठेवोनिया*

*तुळसीहार गळा । कासे पितांबर*

*आवडे निरंतर । हेचि ध्यान*

*मकर कुंडले । तळपती श्रवणी*

*कंठी कौस्तुभ मणी । विराजित*

या अभंगातून विठ्ठलाचे एक काल्पनिक रूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि आपोआपच हात जोडले जातात.

*सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति*

*रखुमाईच्या पती सोयरीया*

*गोड तुझे रूप गोड तुझे नाम*

*देई मज प्रेम सर्वकाळ*

अशी अवस्था केवळ तुकारामांचीच नव्हे तर प्रत्येक सच्चा भक्ताची होते.

*कर कटावरी तुळशीच्या माळा*

*ऐसे रूप डोळा दावी हरी*

*गरुड पारावरी उभा राहिलासी*

*आठवी मानसी तेची रूप*

*झरणी पाझरा होऊ पाहे आता*

*येई पंढरीनाथा भेटावया*

या अभंगात तुकाराम महाराज गोपीच्या भूमिकेतून आपल्या बरोबरीच्या गोपीना म्हणजेच भक्तांना श्रीकृष्णाच्या( विठ्ठलाच्या)

रूपाचे वर्णन करतात. येथे मूळ गोपी म्हणजे त्यांचे मन आणि सख्या म्हणजे इंद्रियाच्या प्रवृत्ती असे रूपक आहे.

या सगुणभक्तीत भक्त आणि परमेश्वर अशी द्वैत भावना आहे. ईश्वराच्या भजन पूजनात भक्त इतका तल्लीन होतो की एका क्षणी तो देहभान विसरतो, त्याचवेळी द्वैतभावनेतून तो अद्वैतात मिसळतो.

*नामस्मरण*

नामस्मरण ही भक्ती मार्गाची दुसरी पायरी.

पांडुरंगाच्या एका नामात विलक्षण शक्ती आहे.

*नाम साराचेही सार*

*शरणागत यम किंकर*

*उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम*

*नाम जपता चंद्रमौळी*

*नामे तरला वाल्या कोळी*

*तुका म्हणे वर्णू काय*

*तारक विठोबाचे पाय*

 

हरीच्या एका नामाने हा भवसागर तरुन जाणे सहज शक्य आहे. मात्र हरी विषयी मनात उत्तम भाव पाहिजे. तो नसेल तर सारे फिके. अन्न कितीही चांगले असले, तरी मिठाशिवाय जशी त्याला चव नाही त्याचप्रमाणे अंतरंगात प्रेम नसेल, मन स्वच्छ नसेल तर नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही. हरी विषयी भाव नसेल तर त्याला टिळे माळा ही बाहेरची भूषणे काय उपयोगाची? प्रेमा वाचून बोलणे म्हणजे केवळ शीणच. या भक्ती मार्गात योग्य आहार, मित आहार इत्यादी साधनांची खटपट करायला लागत नाही. तरून जाण्यासाठी अगदी साधे साधन नारायणाने दाखवले आहे. फक्त हरीचे निरंतर नामसंकीर्तन! त्याने नारायणाची भेट होते. लौकिक व्यवहार टाकण्याचेही काहीच कारण नाही, किंवा अंगाला भस्म फासणे, संन्यासाचा दंड घेणे याचीही आवश्यकता नाही. एका हरीच्या नामा वाचून इतर उपाय व्यर्थ आहेत. प्रपंच करून परमार्थ साधावा असा हा भक्ती मार्ग.

या भक्ती मार्गावरून वाटचाल करत असताना आत्मानात्म विवेक स्थिर होत जातो आणि त्याबरोबर दृश्य स्वरूपाचे (देहाचे)मूल्य हळूहळू क्षीण होत जाऊन आत्मस्वरूपाचे मूल्य वाढू लागते. आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणे, हे त्याचे उत्कर्ष पावण्याचे प्रधान लक्षण आहे.

विवेकाचा चमत्कार असा आहे की विरक्ती आणि भक्ती परस्पर पोषक असून एकमेकांची वाढ करण्यास मदत करतात. दृश्य स्वरूपाबद्दल अनासक्ती हा विरक्तीचा प्राण आहे आणि ईश्वराच्या सहवासाची प्रेम जन्य तळमळ हा भक्तीचा प्राण आहे. जसजशी भक्ती वर्धमान होते तसतशी विरक्ती सुद्धा वाढतच जाते.

भक्त अशा स्थिती पर्यंत पोहोचलेला असतो की जिवा शिवाची गाठ होते. आत्मा अथवा चैतन्य हे विश्वाचे मूलद्रव्य आहे. व्यक्तिगत चैतन्य म्हणजे जीव आणि विश्वगत चैतन्य म्हणजे ईश्वर किंवा शिव.

जीव आणि शिव ही एकाच चैतन्याची दोन अंगे आहेत. जीव अल्प शक्ती, अपूर्ण, सांत, सीमित, मूर्त, अज्ञानी, सकाम आणि परतंत्र असतो याउलट शिव सर्व शक्ती, पूर्ण, अनंत, असीम, अमूर्त, ज्ञानस्वरूप, अकाम व स्वतंत्र असतो. ईश्वर सर्वात्मक आणि सर्वांर्तर्यामी आहे अर्थात आपल्या जिवाहून दूर नाही. जीव व शिव या दोहोंमध्ये मनाचा पडदा आड येतो. मी देह आहे, देहा पुरता सीमित आहे, ही भावना ईश्वर दर्शनाच्या आड येते. ईश्वराचे दर्शन होण्यासाठी आपले मन विश्वगत चैतन्याशी तादात्म्य पावले पाहिजे. ते सूक्ष्म, निर्मळ, व्यापक, निर्विशेष व अहंकार रहित बनले तरच त्यामधील अज्ञान क्षीण होऊन विश्व मनाशी समरस होईल. ईश्वराचे सतत स्मरण ठेवल्याने जीवा मधील अंतरीच्या सूक्ष्म शक्ती

जागृत होतील आणि व्यक्तिगत मन आणि विश्व मन एकमेकात विलीन होईल. तेव्हाच जीवाचे जीव पण लपून….

चिदानंद रूपम् शिवोsहम् शिवोsहम् असा विलक्षण अनुभव येईल.

 

अरूणा मुल्हेरकर

मिशिगन

 

(हा लेख लिहिताना मी तुकारामाची गाथा आणि के.व्ही.बेलसरे यांच्या दासबोधावरील काही विवेचनाचा आधार घेतला आहे)

 

 

*संवाद मिडिया*

 

*आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

🎁🛍️🛒👜👛 👝🎒🧤🥻👔👖🧥💅🏻

 

*🎉🎊आनंदोत्सव २०२३🎊🎉*

 

*🛍️प्रदर्शन व खरेदी🛍️🕺*

 

२८, २९, ३० डिसेंबर २०२३

 

⏰वेळ : दु.३.०० ते रात्रौ ९.००*

 

🎴स्थळ : आर.पी.डी हायस्कुल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

 

▪️डिझायनर साड्या 🥻

▪️डिझायनर कपडे 👗

▪️ज्वेलरी 💍

▪️इंटेरिअर प्रॉडक्ट्स

▪️मसाले 🧂

▪️टॅरो कार्ड रिडर 🎴

▪️पॉटरी

▪️पेंटीग्स

▪️रेडीमेड ड्रेस 👚

▪️मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल🥘

▪️लाईव्ह पोट्रेट 👩🏻

▪️कॅरिकेचर

▪️टॅटु व मेहेंदी स्टॉल्स❤️‍🩹

 

*🃏गंजिफा🃏*

*प्राचिन खेळ (१६ वे शतक)*

 

जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता. तोच खेळ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे.

 

*आयोजक – पौर्णिमा रविकांत सावंत*

 

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – 9067927762

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा