You are currently viewing सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत प्रथम….

सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत प्रथम….

सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत प्रथम….

भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी…

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्यावतीने कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील मदर क्वीन्स हायस्कूलचा विद्यार्थी आयुष दत्ताराम पाटणकर यांने प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुष ने ४०० पैकी ३७८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.

भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुष महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी असोसिएशनच्या दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला होता, त्याला सावंतवाडी येथील उपरकर शूटिंगचे कांचन उपरकर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल मदर क्वीन्स हायस्कूलचे अध्यक्ष खेम सावंत-भोसले, शुभदा देवी भोसले, लखम राजे भोसले, श्रद्धा देवी भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा