You are currently viewing घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

*घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश*

कुडाळ

घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. माजी सरपंच दिनेश वारंग, सरपंच आरती वारंग, शाखाप्रमुख संतोष नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! आ.वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देण्यात आल्या.

यामध्ये घावनळे गावातील संदीप नागवेकर, गजानन कोरगावकर, अक्षय कोरगावकर, वामन तोरस्कर, नामदेव तोरस्कर, महादेव घाडी, कुशाराम घाडी, सखाराम घाडी, राहुल घाडी, दीप्ती तोरस्कर, संतोषी वाळके,सुनंदा कुडतरकर,साक्षी कुडतरकर, राजेश्री राऊळ,मानिका घाडी, सत्यवती घाडी,कल्पना मराठे,विजया तोरस्कर,आनंदी नागवेकर,विजया नागवेकर, आत्माराम घाडी,अर्जुन घाडी, अमोल घाडी, निलेश घाडी, नारायण घाडी,गणेश घाडी, धर्माजी कुडतरकर, सीताराम कुडतरकर, महादेव कुडतरकर, ओंकार कुडतरकर,वासुदेव कुडतरकर,संतोष वाळके, दिनकर तोरस्कर, रघुनाथ तोरस्कर, प्रसाद तोरस्कर, रामचंद्र नागवेकर, विजय तोरस्कर, रमेश नागवेकर, पुंडलिक कोरगावकर, कल्पेश कोरगावकर, शंकर कोरगावकर, गौरव तोरसकर, पुंडलिक तोरस्कर, हर्षल कोरगावकर, प्रमोद तोरस्कर यांसह शेकडो भाजप व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

यावेळी घावनळे माजी सरपंच दिनेश वारंग, सरपंच आरती वारंग, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, दीपक सावंत, गाव संघटक नाना कोरगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, माजी सोसायटी चेअरमन विद्यमान सदस्य जयराम सुद्रिक, युवासेना उपविभाग प्रमुख निलेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव,श्रद्धा तावडे, स्वरा धुरी, महादेव कोरगावकर, योगेश पारकर, प्रवीण कदम, बुवा आनंद कानडे आणि कानडे परिवार, बाळा साउल, आनंद नेवगी, सचिन कोरगावकर, सत्यवान परब, मधु घाडी, वैभव सावंत, समीर धुरी, सत्यवान वारंग, विशाल वारंग, दिगंबर वारंग, अनील वारंग, तुळसुलकर, कोरगावकर, नेवगी, राऊळ, पारकर, कानडे आदी असंख्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा