You are currently viewing स्मृति – भाग ९

स्मृति – भाग ९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति – भाग ९*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आपस्तंब ऋषिंनी संयम , क्रोध , क्षमा , मोक्ष इ. वरती खूप सुंदर श्लोक वजा सुभाषिते आपल्या स्मृतित दिलेली आहेत . वाचनीय तशा सर्वच स्मृति आहेत .माणसाचा आचार विचार उच्चार धर्म सांगण्यासाठी स्मृति लिहिल्या गेल्या . म्हणजे ज्यांनी स्मृति लिहिल्या त्यांना धर्मप्रवर्तक ऋषि म्हणत असत . डॉ काणे यांनी History of DharmaShastra या पुस्तकात स्मृति परम्परेचे यथायोग्य वर्णन केले आहे . तसेच स्मृतिमुक्ताफलात धर्मप्रवर्तक ऋषिंचे नावाने पुढील श्लोक येतो . *अष्टाशीति सहस्त्राणि मुनयो गृहमेधिनः ।* *पुनरावर्तिनो बीज—भूताः धर्मप्रवर्तकाः ।* एवढे ८८००० ऋषिंची नावे ही पाठ करणे शक्य नाही ! तर ग्रंथ दूरच !! मी दिलेल्या नावांव्यतिरिक्त काहींनी स्मृति आणि उपस्मृति असे भाग पाडून वर्गीकरण केले आहे . निर्णयसिंधु या ग्रंथात अंदाजे १२५ पेक्षा जास्त स्मृतिकारांची वचने उद्धृत केलेली आहेत . स्मृतिंवर भाष्य लिहीणारे भविष्य पुराणाचा दाखला देत सांगत असतात की , या पुराणात अस्पष्ट रुपाने स्मृतिंची संख्या अनन्त सांगतात . कुणाकडे भविष्यपुराण असेल तर माझी विनंती आहे की त्यांनी ते वाचून अशा अर्थाचा श्लोक शोधून पाठवण्याची कृपा करावी . माझ्या संग्रहात भर पडेल !असो. आपस्तंब स्मृतित स्त्रीधन वापरणारा पापी असतो , अधोगतीस प्राप्त होतो , असा स्पष्ट उल्लेख आहे . हे सांगण्याचा हेतू शुद्ध आहे . महाभारतात स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारास नीतिशास्त्रकारांनी पूर्णतः माणसास जबाबदार धरले आहे. तरीसुद्धा माझा वाचकांना एक प्रश्न आहे , जिथे पुरुष निरुद्योगी बनून सडक गल्यांवरुन रिकामटेकडे फिरतील तर अत्याचार वाढतील का कमी होतील ? दुसरीकडे मी पुरुषाच्या बरोबरीने काम करु शकते ! असे म्हणून अवेळी घराबाहेर राहणारी स्त्रीदेखील जबाबदार नाही का ? अशा वेळेस समाजाला धर्म समजावून सांगणारे स्मृतिकारच नमस्कारार्ह वाटतात , अन्य नाहीच ! आता पुढील स्मृति *बृहस्पति स्मृति* पाहू .

९)बृहस्पति स्मृति—
या स्मृतित एकूण एकोणऐंशी श्लोक आहेत .यात सुवर्णदान , पृथ्वीदान , गोचर्म लक्षण , नील वृषभ लक्षण , निन्दा वर्णन , भूमिहरण फल , तडागादि निर्माण फल इ. माहिती मिळते .
सुवर्णदान , गोदान व भूमिदानाने माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो .

*त्रीण्याहुरति दानानि गावः पृथ्वी सरस्वती ।*
*तारयन्ति हि दातारं सर्वात्पापादसंशयम्॥*
तीनच उत्तम दाने आहेत . १)गोदान , २) पृथ्वी दान ( भूदान ) आणि ३) सरस्वती ( विद्या ) दान . ही दाने दात्यास सर्व पापांपासून तारतात . तसा एक श्लोक सर्वश्रृत आहेच ! ” अन्नदान हे श्रेष्ठ दान आहेच पण विद्यादान हे त्या ही पेक्षा श्रेष्ठ आहे . कारण अन्नदानाने क्षणिक तृप्ति होते पण विद्येने जन्मभराची !” अशा अर्थाचे !
जेव्हा भूमि , गायी आणि स्त्रीचे बळाने हरण होते आणि प्रत्यक्षदर्शी जर राजाला सूचना देत नाही तर तो ब्रह्मघातकी असतो , हे ही या स्मतित सांगितले आहे . पण सूचना देणारा लोकशाहीत तरुन आजवर तरी गेला नाही ! त्याचे वाटेला दूषित राजकारणाने दुःखच आले आहे . असो.

*वीरासनं वीरशय्यां वीरस्थानमुपाश्रितः ।*
*अक्षय्यास्तस्य लोकाः स्युः सर्वकामागमास्तथा ॥*
जो मानव वीरासन , वीरशय्या व वीरस्थानाचा आश्रय घेतात त्याला अनश्वर लोकांची प्राप्ति होते व त्याच्या सर्व कामनांची पूर्ती होते .
ही स्मृति जो वाचेल त्याच्या चार गोष्टी वाढतात , १)आयु , २)विद्या , ३)यश आणि ४)बल . अशा अर्थाचे श्लोक वाचून मनुष्याने स्वकर्मापासून च्युत होवू नाहीच!! फक्त एकच सांगणे 🙏प्रत्येक स्मृति नमस्कार करण्याइतकीच लायक आहे . त्यावर टीका करणारे मला कधीच रुचले नाहीत , रुचणार ही नाहीत !
आज एवढे पुरेसे वाटते . उद्या पुढील स्मृति पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा