You are currently viewing भावभक्तीने निघालेली अक्षर-वारी- विठ्ठल द्वारी – अभंग वारी

भावभक्तीने निघालेली अक्षर-वारी- विठ्ठल द्वारी – अभंग वारी

*ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण देशपांडे यांनी प्रा.ज्ञानी भा.कुलकर्णी यांच्या “विठ्ठल द्वारी – अभंग वारी” चा दिलेला पुस्तक परिचय*

——————————
भावभक्तीने निघालेली अक्षर-वारी-
विठ्ठल द्वारी – अभंग वारी
——————————–
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरी वारकरी जात असतात, मनात एकच ध्यास असतो..सावळे ते ध्यान पाहू डोळे भरूनी | समाधानाने मन जाई भरूनी |
अशी अवस्था झालेली असते.

काही योग मोठे पुण्यकारक असतात, त्याशिवाय अशा गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही “, शहादा जि. नंदुरबार येथील प्रा.ज्ञानी भालचंद्र कुलकर्णी हे विठुमाऊलीचे निस्सीम भक्त. नऊ वेळा पंढरपूरला पद- वारी करून आलेला हा वारकरी आहे.
त्यांनी कवी-मंडळींना संपर्क साधला आणि “माऊलींच्या कृपेने ” विठ्ठल द्वारी- अभंग वारी ” हा रसाळ आणि भक्तिभाव युक्त अभंग रचनांचा संग्रह प्रा.ज्ञानी भालचंद्र कुलकर्णी यांनी साक्षात विठुरायाच्या चरणी 23 नोव्हेम्बर-2023 ला “कार्तिकी एकादशीला” प्रकाशित -अर्पण केला.
या संग्रहाचे प्रकाशन एकाच दिवशी -श्री.विठ्ठल मंदिर क्षेत्र-पंढरपूर आणि श्री विठ्ठल मंदिर (भोईवाडा), शहादा, जि. नंदुरबार येथे संपन्न झाले.
सन्मित्र क्रीडा मंडळ, शहादा, नंदुरबार हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

156 पानांच्या या संग्रहात वारी आणि वारकरी, भागवत-धर्म ” याबद्दलची मौलिक अशी माहिती प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी देऊन ज्ञानात भर घातली आहे “, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत.

आरंभी प्रस्तावनेत- डॉ.अजयकुमार लोळगे- सेवानिवृत्त विशेषाधिकारी, बालभारती, पुणे- म्हणतात-
प्रा.ज्ञानी कुलकर्णी भाविक वृत्तीचे , दत्त आणि विठ्ठल उपासक, वारीत सहभागी होणारे आअध्यात्मिक वृत्तीचे काहीतरी नवीन करण्याची धडपड. लेखनाची , वाचनाची आवड त्यामुळे या पुस्तकाची निर्मिती झाली.
अभंगाची गोडी आणि लेखन वारीत सहभागी झाल्याने वाढली. अभंगाचे एक नवीन पुस्तक निर्मिती करावी, हा त्यांचा ध्यास…
वरील विवेचन अगदी योग्यच आहे ” हे या संग्रहाचे अंतरंग पाहून जाणवते.

वारी, वारकरी संप्रदाय माहिती..(पृ..13) यात वारीचे व्यवस्थापन, वारीची शिस्त, विठ्ठला बद्दलचा भाव, थोडक्यात वारीची संकल्पना भक्तांना समजावी असा प्रयत्न केला आहे. हा भाग खूप मार्गदर्शन करणारा आहे.

पृ.17- पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची
नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत..हा मजकूर वाचनीय आहे.

“पृष्ठ-19 वर.. एका अज्ञात कवींची ..”पालखी मुक्काम”
ही रचना आहे.. पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली ”
ते पंढरपुरात येतसे माऊली ” असा पूर्ण वारी-क्रमणा
या काव्यातून वाचावयास मिळते.

या संग्रहाचे संपादक- कवी स्वतः ज्ञानी कुलकर्णी यांच्या
वारी- प्रवासाच्या 16 कविता वारीची अनुभूती देणाऱ्या आहेत.. पृ..20 ते पृ..36 यात या रचना आहेत.

या अभंग-वारीतील एक “वारकरी होण्याचे भाग्य मला ही लाभले आहे” .ज्ञानोबामाऊली आणि विठुमाऊलीची कृपा माझ्यावरी आहे” ही भावना अधिक दृढ झाली.

विठ्ठल द्वारी-अभंग वारी ” या संग्रहात “मराठी भाषेत लेखन करणारे कवी, आपल्या प्रांतांतले आहेत, आजू-बाजूच्या प्रांतांतले आहेत, अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे विदेशात वास्तव्य करणाऱ्या मराठी माणसांनी -कवींनी केलेल्या अभंग रचनांचा समावेश या संग्रहातआहे.

एका अर्थाने “विठुनामाचा महिमा, संतांचा महिमा,
वारीचा महिमा, आणि क्षेत्र पंढरपूर ” याचे दर्शन या अभंग संग्रहात घडते. सहभागी कवीचे व्यापक सहभाग स्वरूप पाहता “वैश्विक पातळीवर- यातील अभंग रचना” वाचल्या जाणार आहेत. हे आनंदाचे आहे.

पृ. 37 ते पृष्ठ ..156 यात एकूण 118 रचना आहेत.
बहुसंख्य कवींच्या प्रत्येकी 2 अभंग रचनांचा समावेश संपादकांनी केला आहे.

मी जेव्हा सहभागी कवीचे नामोल्लेख वाचले तेव्हा यात
माझ्या प्रत्यक्ष परिचयाची अनेक नावे दिसली-
उदा-
विजय यशवंत सातपुते (पृ.41 ), बाबू फिलिप डीसोजा((पृ.50), विलास कुलकर्णी(आप्पा महाराज) (पृ. 51 ),
प्रा.बी.एन. चौधरी (पृ.52), सुजित कदम (पृ.60),
प्राची प्रकाश देशपांडे (पृ.99),
दीप राणी गोसावी (पृ.110), माधुरी चौधरी (पृ.111),
आणि
फेसबुक आणि व्हाट्सअप्प वरील साहित्य-समूहात ज्यांचे लेखन माझ्या वाचनात नित्यनेमाने येते,पण अजून यांच्याशी कधी संवाद-भेट झाली नाहीये, असेही मान्यवर कवी यात आहेत-
उदा-
डॉ.गौरी एदलाबादकर (पृ.47 ), सौ.लतिका चौधरी (पृ.62), डॉ.दक्षा पंडित (पृ.68), डॉ.दिलीप पंडित (पृ.70),
बापू दासरी (पृ.104), मनीषा रायजादे-पाटील (पृ.124),
भारती-महाजन रायबागकर (पृ.125),सौ.हेमलता शरद पाटील (पृ.127), अजय रमेश चव्हाण (पृ.136),

याशिवाय अनेक मान्यवर-नामवंत कविजन यात आहेत.
विठुरायाच्या चरणी” या सर्वांची अक्षर-सेवा संपादक प्रा.ज्ञानी भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्फत रुजू झाली आहे,
सर्व सहभागी कवी-कवयित्रीचा वतीने मी एक सहभागी कवी, त्यांना धन्यवाद देतो.

विठुरायाच्या सर्व-सुंदर दर्शनाची अनुभूती या संग्रहाच्या मुखपृष्ठवर येते, अंतरंग -स्वरूप तितकेच देखणे आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेणाऱ्या टीमचे कौतुक करून त्यांनाही धन्यवाद देतो.

या संग्रहातील समाविष्ट रचना इथे न देण्याचे कारण आहे-
वाचकांनी उत्सुकतेने “विठ्ठल द्वारी अभंग वारी ” हे पुस्तक घेऊन संग्रही ठेवावे, आणि भक्तीभावनेची अनुभूती देणाऱ्या अभंगाचे वाचन करावे. ही विनंती करतो.

ज्ञानोबा -तुकाराम ||पंढरीनाथ महाराज की जय ||
जय जय रामकृष्ण हरी ||
***************************
पुस्तक-परिचय लेखक-
अरुण वि.देशपांडे-पुणे
संपर्क- 9850177342
————————————-
विठ्ठल द्वारी अभंग वारी
(अभंग संग्रह)
पृ.156, स्वागत मूल्य- रु.200/-
संपादक- प्रा.ज्ञानी भालचंद्र कुलकर्णी
शहादा, जि. नंदुरबार.
संपर्क- 9404070899
9094559393
—————————————
प्रकाशक- सन्मित्र क्रीडा मंडळ- शहादा
—————————————-

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा