You are currently viewing स्मृति भाग ५
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्मृति भाग ५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग ५*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आता चवथ्या स्मृतिचा विचार .
४)औशनस संहिता—
माझ्या माहितीत औशनस हे नाव दानवगुरु शुक्राचार्यांचे आहे . जाणकारांनी प्रकाश टाकावा.🙏🙏
या संहितेत वा स्मृतित एक्कावन्न श्लोक येतात . चातुर्वर्णांमधील अनुलोम—विलोम विवाहातून निर्माण होणार्‍या जाती व वृत्तींचे वर्णन त्याकाळातील मान्यता , समाजरचना व नियमानुसार केलेले आहे .
आज हे चित्र भिन्न असू शकते ? पण वृत्तींचा अभ्यास होणे गरजेचेच ! असो .

५)आङ्गिरस स्मृति—
यात एकूण बाहात्तर श्लोक येतात . प्रायश्चित्त वर्णन ( चुकीचे कार्य केल्यावर शरीर व मन शुद्धिसाठी करावी लागणारी क्रिया ) , उच्छिष्ट भोजन , वस्त्र धारण , भोजन दानादि विषय येतात .
ह्या अंगिरा ऋषि स्मृतित एक श्लोक पुन्हा मनाचा वेध घेतो . तत्पूर्वी स्त्रीची शुध्दी रजोनिवृत्तीने होते . रजोनिवृत्तीनंतरच स्नान करावे . ( म्हणजे तीन दिवस करु नये ! अशा अर्थाने सांगितले आहे ) . जोपर्यंत रजःप्रवृत्ती आहे तोवर उत्तम कर्म करु नये ( म्हणजे विश्रांति महत्वाची . स्वयंपाकही उत्तम कर्मात येतो. अग्निजवळ जावू नये म्हणून ) असे सांगितले आहे . आता तो लक्ष वेधणारा श्लोक —
*रोगेण यद्रजः स्त्रीणामत्यर्थ हि प्रवर्तते ।*
*अशुद्धास्ता न तेन स्युस्तासां वैकारिकं हि तत् ॥३६॥*
म्हणजे रोगामुळे जर स्त्रीस रज(रक्त) स्त्राव होत असेल तर त्या कारणाने ती अशुद्ध होत नाही ! कारण शारिरीक रोग अन्य रक्तस्त्रावाने होतात. (तो प्राकृत स्त्राव नसतो .)
इथे हे सांगू इच्छितो की आपल्या देशातील बहुतेक आदिवासी वनवासी स्त्रिया त्या चार दिवसात घरातल्या पाण्याला शिवत नाहीत. कारण पाण्यावर मानसिक परिणाम लवकर होतात , हे त्यांना सांगायला कोण गेलं होतं ! आमच्या भारतातील अदमासे सात लाख खेड्यात व वनात ऋषि आणि ब्राह्मण ऋषिविचार निःस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने वाटत फिरले , हे कसं विसरता येईल ? आणि हा शुद्ध वैद्यकीय विचार स्मृतितून मिळत असेल तर स्मृति वाईट असू शकतात ? कुठलाही ग्रंथ वाचल्याशिवाय त्याला चांगल वाईट म्हणू नाही ! अन्यथा तो त्या माणसातील मूर्खपणा असतो—अशा अर्थाचे सुभाषित संस्कृतमधे आहे . आणि असं असेल तर त्या मूर्खांची संख्या न मोजलेलीच बरी !😂😂
अजून एक श्लोक येतो .
*राजान्नं हरते तेजः शूद्रान्नं ब्रह्मवर्चसम्।*
*सूतकेषुच यो भुङ्क्ते स भुङ्क्ते पृथिवीमलम् ॥*
म्हणजे राजाचे अन्न ( राजस दोषयुक्त ) तेज हरण करते , शूद्राचे अन्न ब्रह्मतेज हरण करते , सूतकाच्या अन्नाचे भक्षण म्हणजे पृथ्वीचा मळ खाणेच होय !
या श्लोकास वाचल्यावर मी वडिलांना ( शिक्षक ) विचारले होते , ” म्हणून सरकारी पगार घेणारे तेजोहीन असतात ? ” तेंव्हा वडिल म्हणायचे , ” तेजस्विता टिकवण्यासाठी मी स्वाध्याय करतोय ! ” असे वैचारिक विनोदी संवाद आमचे व्हायचे . आता शूद्राबद्दल पुन्हा आक्षेप येण्यासारखा आहे ! आणि शबरीचे उदाहरणही आहे ! रामाचे ब्रह्मतेज कुठे नाहिसे झाले ? पण शूद्र हा शब्द बरेच ठिकाणी वैचारिक अशुद्धता वा वैचारिक मागासलेपणा वा शारिरीक अस्वच्छता आणि अनियमितता अशी शूद्रता म्हणून येतो , हे आम्हाला कसं कळेल , आम्ही जर सुसंस्कृत नाही तर !!!! ( आता तर कोरोनाच शिकवतोय स्वच्छता व शुद्धता ! ) तिसरी गोष्ट सूतकासंबंधी . इथे गफलत होते . सूतः आणि सूतकः एकच .पण जिथे मनुष्य मृत झाला आहे तिथे सूतक असते , ” तिथले भक्षण ” असा अर्थ घ्यावा का सूतपुत्र असा घ्यावा ? मग सूतपुत्र कोण ? तर औशनस संहितेत ” ब्राह्मण कन्येस क्षत्रियापासून उत्पन्न झालेला पुत्र म्हणजे सूतपुत्र ( उदा. विदुर ) जाणावा ” , असे लिहिले आहे . मग पुन्हा प्रश्न येतो , श्रीकृष्ण तर कृष्णशिष्टाईचे वेळेस विदुरा घरी जेवले ? १)ते प्रत्यक्ष योगेश्वर होते , २) दैवादिकांच्या वागण्याचे अपवाद आपण साधारण मनुष्य घेवू शकतो ? ३) आम्ही आचारविचाराने हीन वागून धर्मग्रंथांवर आक्षेप घेण्याचे काम त्याच धर्मात जन्मून सुद्धा निर्लज्जतेने घेवू शकतो ? हे प्रश्न ही निर्माण होतात . पण प्रत्यक्ष भीष्मांना धर्मोपदेश सांगण्याची व आसुरी प्रवृत्तीस जरब असणारा विदुरासारखा मानव श्रेष्ठच ! म्हणून भगवान त्याचे घरी उतरले व जेवले . समविचारीकडे उतरावे , दुःशासनाकडे नाही ! हे श्रीकृष्णास कुणी सांगायला हवं ! आणि जिथे ” सूतक ” आहे तिथे त्रास कसा द्यावा ? जिथे सूतक असते तिथे दुःख असते , तिथलं अन्न कसं भक्षण करावं ? कारण ” अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठं ” म्हणजे अन्न हे माणसाची वृत्ती तयार करते ! असे निरनिराळे प्रश्न आणि उत्तरे मनात निर्माण होतात ! पृथ्वीचा मळ म्हणजे मी ” मृत्तिका म्हणजे माती ” समजतो . चूक असल्यास सांगावे .🙏🙏
खरंच , आज एकेक श्लोक समजायला वेळ कुणाकडे आहे ? आणि तो न समजताच आम्ही फक्त प्रश्नांचा भडिमार करतो व तो हि आक्षेपजनक !! कधि असा प्रश्न पडतो , आमच्या ऋषिंचे नाव व त्यांचे लिखाण चार युगे टिकले ! आम्ही आणि आमचे नाव आम्ही मेल्यावर दुसरेच दिवशी जग विसरेल ! तरी हा आक्षेपांचा निर्लज्जपणा करण्याचं धाडस होतं कसं ? कठीण आहे !!! ऋषिंना नमस्कार करतो व थांबतो . उर्वरीत पुढील भागात .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मिडिया*

*मिड नाईट कार्निवल*

आता ऑफिस किंवा बिझनेसच्या वेळे मध्ये शो – रूम ला येण्याची गरज नाही..
खास आपल्या सुविधे करिता आम्ही हजर असणार आहोत रात्री उशिरा पर्यंत..
https://sanwadmedia.com/119321/

आकर्षक डिस्काउंट , टेस्ट ड्राइव्ह डेमो सहित रिफ्रेशमेंट सुविधा उपलब्ध..

आजच भेट द्या अथवा कॉल करा..

*एस.पी.ऑटोहब*
रत्नागिरी |. चिपळूण | कणकवली
*7477-959595*

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119321/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा