*जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभाराविषयी डाॅक्टर अधीकाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली झाडाझडती.*
*जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड.*
आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव व कुणाल माळविदे , ओंकार वजांरे या शिष्टमंडळने सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी डॉ. मनोज जोशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची भेट घेत, आरोग्याच्या प्रश्नांवर चर्चा केली असता असे आढळून आले की मेडिकल कॉलेजचे डिन व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना फार त्रास सहन करावा लागत आहे. म्हणजेच की रुग्णालयातील पेशंटच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलेल्या तक्रारी नुसार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांवर कोणाचाही अंकुश नाही, पेशंट राऊंडच्या वेळी रुग्णांना व्यवस्थित आजारा विषयी माहिती दिली जात नाही ,टाईम शेड्युल प्रमाणे डॉक्टर व्हिझिट होत नाही, धीम्या गतीने आजारांवर उपचार होतात .जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पेशंट राऊंड करू नये ,प्रिस्क्रिप्शन देऊ नये, एकंदरीत हस्तक्षेप करू नये असे मेडिकल कॉलेज कडून सूचना दिल्या जातात अशा सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली.एकंदरीत कारभाराविषयी कोणाचा कोणाला मेळ नाही. औषध पुरवठा विषयी आत्ताच निधी उपलब्ध झाला असून खरेदी अजून बाकी आहे. या सर्व प्रश्नांच्या भडीमारावर मेडिकल कॉलेज व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संयुक्त बैठक आयोजित करावी आपआपल्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात याबाबत मागणी केली असता मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मनोज जोशी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली.
त्याचसोबत मेडिकल कॉलेज मार्फत सुरू असणारी कंत्राटी कामगार भरती ही कोणत्याही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात न देता खाजगी कंपनीमार्फत संशयास्पद रित्या सुरू असुन या भरतीबाबत मेडिकल कॉलेजचे अधिकारी डॉक्टर मनोज जोशी यांना जाब विचारण्यात आला असता, याबाबत योग्य ती कारवाई करून स्थानिक बेरोजगारांना सामावून घेण्याचे व रीतसर स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे आश्वासन देण्यात आले.