You are currently viewing कणकवलीचा पर्यटन महोत्सव ११ ते १४ जानेवारीला – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवलीचा पर्यटन महोत्सव ११ ते १४ जानेवारीला – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवलीचा पर्यटन महोत्सव ११ ते १४ जानेवारीला – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली नगरपंचायत माजी पदाधिकाऱ्यांकडून आयोजन; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली

कणकवली नगरपंचायत माजी पदाधिकाऱ्यांकडून पर्यटन महोत्सव २०२४ चे ११ ते १४ जानेवारी या कालावधीत होणार आहे. आता नगरपंचायत मध्ये प्रशासक आहेत. तरी देखील आम्ही सर्वांनी पर्यटन महोत्सव घेण्यासाठी आ.नितेश राणेंना भेटलो,त्यांनी महोत्सव घ्यावा,आपण पाठीशी आहोत असे सांगितले.कणकवली शहरातील नागरिकांना पर्यटन महोत्सवाचा आनंद मिळावा,या भावनेतून दरवर्षी प्रमाणे हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अभिजित मुसळे,अजय गांगण,मेघा गांगण,राजू गवाणकर आदी उपस्थित होते.

११ डिसेंबर २०२३ या कालावधीत कणकवली शहरात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ढोल पथक,दशवातर कलाकार,१७ प्रभागांचे चित्ररथ , बैलगाडी ही शोभा यात्रा ११ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता पटकी देवी बाजारपेठ मार्गे उपजिल्हा रुग्णालयात कणकवली समोरील मैदान पर्यंत जाईल.त्यानंतर बेधुंद ऑर्केस्ट्रा सिने कलाकारांच्या उपस्थितीत होईल.या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण,माजी खा.निलेश राणे,आ.नितेश राणे,माजी आ.प्रमोद जठार ,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत,जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल.यावेळी महोत्सवात फूड फेस्टिवल उद्घाटन रोटरी क्लब पदाधिकारीच्या उपस्थितीत होईल.

दुसरा दिवस म्हणजेच १२ जानेवारी रोजी कणकवली ही सांस्कृतिक परंपरा असलेली भूमी आहे. त्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले जाईल.कणकवली येथील कलाकारांचा भव्य कार्यक्रम होईल.त्यात २०० कलाकारांचा सहभाग असेल,त्याचे संयोजन जेष्ठ कलाकार सुहास वरुणकर, प्रा.हरिभाऊ भिसे हे आयोजन करणार आहेत ,हा कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरु होईल.तत्पूर्वी सायंकाळी ७ वाजता पदर प्रतिष्ठान महिला कलाकार सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सादर करणार आहेत.शनिवार १३ जानेवारी भव्य ऑर्केस्ट्रा होईल,नामवंत टिव्ही कलाकार,कॉमेडी कलाकार असणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा