You are currently viewing महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्र्याची गरज, ड्रायव्हर नको…

महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्र्याची गरज, ड्रायव्हर नको…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल

कुडाळ
ठाकरे सरकारला आज वर्ष पूर्ती झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत खरपूस समाचार घेतला. यावेळी नारायण राणे म्हणाले की, आजच्या मुलाखतीत महाराष्ट्रातील विकासकामे किंवा जटील प्रश्नावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नसून, या सरकारने दिलेल्या आश्वासनानपैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या ऐवजी त्यानी फक्त धमक्या दिल्या आहेत. यावेळी त्यांनी फक्त ५६ आमदार असलेले सरकार किती दिवस टिकेल असा टोला देखील लगावला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टिका करण्याची पात्रता मुख्यमंत्र्याची आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
दिशा सलवान हिचा बलात्कार करून खून करण्यात आला असून, सुशांतसिंग राजपूत चा देखील खूनच असल्याचा त्यानी पुनरुच्चार केला. महाराष्ट्राला निष्क्रिय मुख्यमंत्री लाभल्यानेच कोरोना काळात महाराष्ट्रातील बळीची संख्या जास्त असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा उच्चारत असलेल्या मी मर्द आहे या वाक्याचा देखील योग्य समाचार घेत त्यांनी मर्दाला मर्द म्हणण्याची गरज नसते असा टोला देखील लगावला. उद्धव ठाकरे सारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा लाभल्यास ते महाराष्ट्राचे दुर्दैव असेल असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच यावेळी त्यानी हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नसल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेच्या सगळ्या कुंडल्या माहिती असून खोटे बोलल तर महागात पडेल, पळता भुई थोडी होईल. असा इशारा देत शिवसेना संपल्यात जमा असल्याचे विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांची गरज असून ड्रायव्हर नको… अशी जोरदार टीका त्यांनी कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी स्वतः ची गाडी स्वतः चालवली होती या मुलाखतीच्या विधानावर केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 13 =