You are currently viewing मालवण ते मार्लेश्वर एस. टी. बस सुरू…..

मालवण ते मार्लेश्वर एस. टी. बस सुरू…..

वैभववाडी

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख आगारातील मालवण मार्लेश्वर एस. टी. बस सुरू करण्यात आली आहे. ही एस. टी. बस भुईबावडा मार्गे पाचल व्हाया करणार आहे. तरी प्रवाशांनी या एस. टी. बसचा लाभ घ्यावा. असे आवाहन भुईबावडा शिवसेना शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनी केली आहे.
एस. टी. बस सुटण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः- मालवणहून सकाळी ७. वाजता प्रस्थान, भुईबावडा येथे सकाळी १०. वा. मार्लेश्वरला दुपारी १ वाजता पोहोचणार. तसेच मार्लेश्वरहून दुपारी १२. वाजता सुटणारी मार्लेश्वर मालवण एस. टी. बस भुईबावडा येथे दुपारी २.४५ वा. पोहोचणार.
तेथून पुढे वैभववाडी, फोंडा, कणकवली आचरा मार्गे मालवणला संध्याकाळी पोहोचणार तरी या एस. टी. बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. असे आवाहन भुईबावडा शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =