You are currently viewing राणी जानकीबाई वैद्यकीय रुग्णालयात विचारे आणि परब कुटुंबियांनकडून सेराजम मसाज मशीन भेट..

राणी जानकीबाई वैद्यकीय रुग्णालयात विचारे आणि परब कुटुंबियांनकडून सेराजम मसाज मशीन भेट..

सावंतवाडी:

श्रीमती कुसुम विचारे, सावंतवाडी , श्रीमती लक्ष्मी बाबाजी परब, अंधेरी-मुंबई या दोन कुटुंबीयांनी सावंतवाडी येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था रुग्णालय सावंतवाडी येथे.रुग्णाच्या सोयीसाठी “सेराजम मसाज मशीन” देणगी स्वरुपात देण्यात आली आहे.सावंतवाडी वैद्यकीय रुग्णालयातील पंचकर्म विभागात रुग्णांची गरज लक्षात घेऊन
विचारे कुटुंबियांनी आणि परब कुटुंबीयांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ “सेराजम मसाज मशीन” देणगी स्वरुपात उपलब्ध रुग्णालयात दिली आहे.यावेळी नंदू. विचारे, क्षमा विचारे, कुसुम विचारे, लक्ष्मी परब, डॉ.बाबासाहेब पाटील, प्रिन्सिपॉल डॉ.नंदादीप चोडणकर, डॉ.प्रवीण देवऋषी, मीनल नाईक, करुणा गावडे, संतोष आनंद नाईक, विनोद सावंत, सतीश चव्हाण, गणेश पाटील हे “सेराजम मसाज मशीन” देतेवेळी उपस्थित होते.

अश्या प्रकारच्या वस्तू देणगी दिल्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्हयातील गोरगरिब रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा या रुग्णालयामार्फत देता येतील. आपल्या सारख्या सेवाभावी नागरिकांमुळे आम्ही रुग्णसेवेचे कार्य निरंतर व चांगल्या रीतीने करु शकतो.असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seven =