You are currently viewing शतक महोत्सवी शाळा हे भालावल गावचे भूषण – मंत्री दीपक केसरकर

शतक महोत्सवी शाळा हे भालावल गावचे भूषण – मंत्री दीपक केसरकर

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधीची ग्वाहही

 

सावंतवाडी :;

शतक महोत्सवी शाळा हे भालावल गावचे भूषण असून ग्रामस्थ एकजुटीने शाळेचा शतक महोत्सव साजरा करीत आहे हे गौरवास्पद आहे. गावाच्या विकासासाठी ही एकजूट अशीच कायम ठेवा. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून पूर्वीप्रमाणेच यापुढेही भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भालावलवासीयांना दिली.

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्यात मंत्री दीपक केसरकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सावंतवाडीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे वेंगुर्ले तालुका प्रमुख सचिन वालावलकर, माजी उपसभापती विनायक दळवी, सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, सरमळे विजय गावडे वेंगुर्ले शहर प्रमुख नितीन मांजरेकर, शतक महोत्सव समिती अध्यक्ष महेश परब, आर्किटेक अमित कामत, माजी उपसभापती कृष्णा सावंत, शिवसेना माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर, तांबोळी माजी सरपंच शिवराम सावंत, सोनू दळवी, विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, मंत्री दीपक केसरकर यांचे पिए जितेंद्र काळे, रामचंद्र आंगणे, वसंत परब, झिलु परब, नागेश परब, ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर, ऋषाली परब, गंघा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम परब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता कोठावळे, माजी उपसरपंच अशोक परब, वामन परब, श्रीकृष्ण परव, अशोक परब, अपूर्वा सावंत, सई सावंत, गंगाराम परब, भिवा परब, अर्चना परब, स्नेहा परब, जनार्दन गावडे, शाळेच्या शिक्षिका सौ गौंडळकर, शिक्षक श्री ढवळी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाळेसाठी मोफत जमीन दिलेल्या भिवा परब, नागेश परब, रुक्मिणी परब, जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सानिका आत्माराम परब, लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या प्रेमा वामन परब तसेच शाळेतील इयत्ता पहिलीतील कमी वयाचा विद्यार्थी कु स्वस्तिक राजेश गुळेकर यांचा मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त गटविकास अधिकारी राजाराम परब यांनी सुत्रसंचालन उदय परब यांनी तर आभार शिक्षक विठ्ठल कुंभार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा